बहिणीला त्रास देणार्याची हत्या करून मृतदेह जाळला !
सातारा, ८ एप्रिल (वार्ता.) – ६ एप्रिल या दिवशी रविवार पेठेतील खंडोबाचा माळ परिसरात एक अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला. स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अवघ्या ३ घंट्यांमध्ये या घटनेचा उलगडा केला.
आकाश राजेंद्र शिवदास असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आकाश हा पेठेतीलच विक्रांत कांबळे यांच्या बहिणीला त्रास देत होता. त्यामुळे चिडून विक्रांत कांबळे, तेजस आवळे आणि संग्राम रणपिसे यांनी आकाश यांची डोक्यात दगड घालून हत्या केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आकाश यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात जमा झाले. त्यांनी आरोपींना कह्यात घेतल्याविना मृतदेह घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तणाव वाढला होता.