२२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट
जगभरात १३ कोटी ३० लाखांहून अधिक रुग्ण
नवी देहली – भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतांनाच जगभरातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यांमध्ये ब्राझिल, फ्रान्स, युक्रेन आणि रशिया यांसारख्या देशांचा समावेश आहे. जगभरामध्ये ५ एप्रिलपर्यंत कोरोनाचे १३ कोटी ३० लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणानंतर रुग्णसंख्येत वाढ झाली असून, जपानमध्ये चौथी लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. #Coronavirus #World https://t.co/jkCuZc2bnA
— Lokmat (@MiLOKMAT) April 8, 2021
कोरोनामुळे २८ लाख ८६ सहस्र जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० कोटी ७२ लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जगभरामध्ये २ कोटी २८ लाख लोकांवर उपचार चालू आहेत. ९९ सहस्र ५०० हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे.