कै. शंकर सोमा पालन यांच्या मृत्यूविषयी त्यांच्या कुटुंबियांना मिळालेल्या पूर्वसूचना !
अनेक दिवसांपासून रुग्णाईत असलेले फोंडा, गोवा येथे रहाणारे शंकर पालन यांचे ३०.३.२०२१ या दिवशी दुपारी ३.१० वाजता निधन झाले. ९ एप्रिल हा मृत्यूनंतरचा अकरावा दिवस आहे. त्यांच्या मृत्यूविषयी कुटुंबियांना मिळालेल्या पूर्वसूचना येथे दिल्या आहेत.
१. श्री. विनोद पालन (मुलगा)
१ अ. ‘वडिलांची शेवटची घटिका जवळ आली आहे’, असे वाटणे : बाबांच्या मृत्यूपूर्वी २ आठवडे अधूनमधून माझ्या मनात त्यांच्या मृत्यूचेे विचार येत होते. मृत्यूच्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांना त्रास झाला. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘बाबांची शेवटची घटिका आता जवळ आली आहे.’ सकाळी १०.३० वाजता मी श्री. श्रीकांत पिसोळकरकाका (आमचे शेजारी) यांना हा विचार सांगितला.
२. कु. योगिता पालन (मुलगी)
२ अ. वडिलांनी बोलण्याला काहीच प्रतिसाद न देणे, तेव्हा वडिलांना दुखणे सहन होत नसून आता ‘लवकरच देव त्यांना यातून मुक्त करेल’, असे विचार येणे : मी पुष्कळ दिवसांनी होळीच्या दिवशी घरी गेले होते. तेव्हा बाबांची प्रकृती फारच खालावली होती. त्यांना पाहून मला क्षणभर एकदम धस्स झाले आणि ‘त्यांची जाण्याची वेळ जवळ आली आहे’, असे वाटलेे. मी बाबांना हाक मारून त्यांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यांनी माझ्याकडे पाहिलेही नाही; कारण त्यांना काहीच कळत नव्हते. ‘त्यांना पुष्कळ त्रास होत असून दुखणे असह्य झाले आहे आणि देव त्यांना यातून मुक्त करणार आहे’, असे मला जाणवले.
२ आ. मोठ्या भावानेही ‘वडिलांची स्थिती फार खालावली आहे’, असे सांगणे : रात्री दादा (श्री. विनोद पालन) मला सांगत होता, ‘बाबांची स्थिती फार खालावली आहे. त्यांना सारखे साहाय्य लागते. त्यामुळे सध्या मी घरीच रहावे’, असे मला वाटते. तेव्हाही मला अंतर्मनातून फार तीव्रतेने वाटले, ‘देव बाबांना आता मुक्त करणार आहे.’
२ इ. ‘वडील मृत्यूच्या जवळ आहेत’, असे वाटणे : बाबा अनेकदा अशा स्थितीतूनही बाहेर पडले आहेत, तरीही या वेळी ‘ते मृत्यूच्या फार जवळ आले आहेत’, असे मला वाटत होते.
३. सौ. वेदिका पालन (सून)
३ अ. ‘या गुढीपाडव्याला सासरे नसतील’, असा विचार येणे : ‘सासर्यांच्या (बाबांच्या) मृत्यूपूर्वी २ – ३ दिवस अगोदर ‘या वेळी गुढीपाडव्याला बाबा नसणार, कदाचित् पुढील आठवड्यातही ते नसतील’, असे विचार मनात आले.
३ आ. सासरे त्यांच्या पलंगावर असतांनाही ते न दिसणे : एकदा बाबा झोपत असलेल्या खोलीत मी दुसर्या खोलीतून पाहिल्यावर मला बाबा पलंगावर दिसलेच नाहीत. एरव्ही तिथून मला ते दिसायचे; पण या वेळी दिसले नाहीत. तेव्हा मला वाटले, ‘मी झोपेत आहे, त्यामुळे मला दिसले नसतील’; म्हणून मी डोळे नीट उघडून पहिले, तरीही मला ते दिसले नाहीत.
३ इ. ‘सासरे शून्यात जात आहेत’, असे वाटणे : एक आठवड्यापासून बाबांकडे पहातांना ‘ते शून्यात जात आहेत. लवकरच देव त्यांना मुक्त करणार आहे’, असा विचार माझ्या मनात आला होता.
३ ई. मृत्यूच्या २ – ३ दिवस अगोदर त्यांचा तोंडवळा वेगळाच दिसत होता. तेव्हा ‘त्यांचा मृत्यू जवळ आला आहे’, असे मला वाटले.’
|