मुंबईत लसीअभावी ४० टक्के लसीकरण केंद्रे बंद
दीड दिवस पुरेल इतकाच साठा शेष
मुंबई – मुंबईमध्ये केवळ दीड दिवस पुरेल इतकाच कोरोनावरील लसीचा साठा शेष आहे. मुंबईमध्ये एकूण १२० लसीकरण केंद्रे आहेत. त्यांतील ४० लसीकरण केंद्रे लसीच्या अभावी बंद झाली आहेत. मुंबईसाठी लस उपलब्ध झाली नाही, तर १० एप्रिल या दिवशी लसीकरण करता येणार नाही, अशी स्थिती आहे. एकूण लसीकरण केंद्रांपैकी ७३ खासगी केंद्रे आहेत. ९ एप्रिल या दिवशी लस उपलब्ध झाली नाही, तर ही सर्व खासगी केंद्रे बंद करावी लागतील. त्यानंतर शासकीय केंद्रे बंद करण्यात येतील.