एन्.सी.ई.आर्.टी.चे संचालक आणि शिक्षण मंत्रालय यांना न्यायालयाची नोटीस
एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकात शहाजहान आणि औरंगजेब यांनी मंदिरांची डागडुजी केल्याचा चुकीचा उल्लेख केल्याचे प्रकरण !
इस्लामी आक्रमकांचे उदात्तीकरण करून त्यांच्या विषयी विद्यार्थ्यांच्या मनात आदरभाव निर्माण करू पहाणार्या एन्.सी.ई.आर्.टी.च्या संबंधितांवर कारवाई करा !
जयपूर (राजस्थान) – एन्.सी.ई.आर्.टी.च्या १२वीच्या पुस्तकात मोगलांचे उदात्तीकरण करण्यासाठी कोणताही आधार नसल्यावरून जयपूरच्या न्यायालयाने एन्.सी.ई.आर्.टी.चे संचालक आणि शिक्षण मंत्रालय यांना नोटीस बजावली आहे. १९ एप्रिलपर्यंत यावर उत्तर देण्यास सांगितले आहे. न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेत ‘पुस्तकामध्ये अयोग्य माहिती देण्यात आली असून ती हटवण्यात यावी’, अशी मागणी करण्यात आली आहे. या पुस्तकात म्हटले आहेे की, शहाजहान आणि औरंगजेब यांनी युद्धात पाडण्यात आलेल्या हिंदूंच्या मंदिरांची डागडुजी करण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी आर्थिक तरतूद केली होती.