सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात वाढ
एकाच दिवशी ११७ नवीन रुग्ण, दोघांचा मृत्यू
१. मृत्यू झालेले एकूण रुग्ण १९२
२. उपचार चालू असलेले रुग्ण ७९२
३. बरे झालेले एकूण रुग्ण ६ सहस्र ६७१
४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ७ सहस्र ६६१
कुडाळ बाजारपेठेत कोरोनाविषयक नियमांचा फज्जा
कुडाळ – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते; मात्र प्रत्येक बुधवारी असलेला कुडाळचा आठवडा बाजार ७ एप्रिल या दिवशीही मोठ्या प्रमाणात भरल्याने कोरोनाविषयक नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. याविषयी नगरपंचायत कार्यालयात विचारले असता मुख्याधिकार्यांनी ‘आठवडा बाजार नेहमीप्रमाणे भरलेला नाही; पण शहरात गर्दी आहे. नगरपंचायतीच्या कर्मचार्यांना कुडाळ बाहेरील व्यापार्यांना हटवण्यासाठी सांगण्यात आले आहे, असे सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीची टंचाई
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीची टंचाई निर्माण झाली आहे. बहुतांश ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतील लस संपली आहे. उपकेंद्रांत लस नसल्याने ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित लस पुरवावी, अशी मागणी होत आहे.