सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे आज्ञापालन केल्यावर सौ. संगीता लोटलीकर यांना आलेल्या अनुभूती
१. हिंदु धर्मजागृती सभेत प्रवचन चालू केल्यावर वीज जाणे, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेले उपाय केल्यावर एका धर्माभिमान्याने बल्ब आणून तो चालू करणे आणि पूर्ण सभा संपून आवराआवर करेपर्यंत तो चालू रहाणे
‘२९.१२.२०१६ या दिवशी उरण येथे दादर गावात हिंदु धर्मजागृती सभा होती. सौ. मांढरे यांनी प्रवचनाला प्रारंभ केला. १० मिनिटांतच वीज गेली. ध्वनीवर्धक यंत्रणा चालू होती. अंधार पडत चालला होता. ‘काय करावे ?’, ते मला कळत नव्हते. मी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना दूरभाष केला आणि परिस्थिती सांगितली. सभेला १५० ते १७५ लोकांची उपस्थिती होती. सद्गुरु ताईंना उपाय विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘काही नको. प्रार्थना वाढवा आणि ध्वनीवर्धक यंत्रणेजवळ लावता आली, तर नामपट्टी लावा.’’ सद्गुरु ताईंशी बोलल्यावर केवळ ५ मिनिटांनी एक धर्माभिमानी घरातून बल्ब घेऊन आले आणि त्यांनी तो लावला. ती सभा संपून आवराआवर करेपर्यंत बल्ब चालू होता. विषय संपेपर्यंत कुणीही उठले नव्हते. या प्रसंगात ‘अडचणी सांगणे आणि संतांचे ऐकणे’ याचे महत्त्व लक्षात आले. ‘वीज जाण्याचा अजून एक लाभ म्हणजे गावातील सर्व जण बाहेर उभे राहून सभा ऐकत होते’, हे नंतर समजले. ध्वनीवर्धक यंत्रणेचा आवाज गावात एकदम चांगला ऐकू जात होता, हे आणखी एक वैशिष्ट्य !
२. रुग्णाईत साधिकेने सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेला न्यास केल्यावर तिला बरे वाटणे
महाडच्या सौ. पुरोहितकाकूंना नेरुळ येथे रुग्णालयात आणले होते. त्यांची लघवी तुंबली होती. आधुनिक वैद्यांनी ‘दुसर्या रुग्णालयात त्वरित घेऊन जा’, असे सांगितले. आम्ही सिद्धता केली आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना सांगितले. तेव्हा त्यांनी सौ. पुरोहितकाकूंना न्यास करायला सांगितला. अर्ध्या घंट्यात त्यांना होणारा त्रास न्यून झाला आणि त्यांना नेरुळ रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय झाला. हे सर्व पाहून सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– सौ. संगीता लोटलीकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.१.२०१७)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |