अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी शिवसेनेशी संपर्क साधावा ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ
कोरोना लढ्यासाठी शिवसेनेची ‘माझे शहर-माझी जबाबदारी’ हेल्पलाईन मोहीम
कोल्हापूर, ७ एप्रिल – राज्यशासनाने चालू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमे’नुसार कोरोना रुग्णांवर उपचार आणि लसीकरण केले जात आहे. त्याच धर्तीवर कोल्हापूर शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि गतवर्षीचा कोरोनाचा अनुभव लक्षात घेता शहरातील नागरिकांसाठी शिवसेना ‘माझे शहर-माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेत आहे. यामध्ये ‘हेल्पलाईन क्र मांका’शी संपर्क साधून अत्यावश्यक रुग्णसेवा आणि कोरोनाविषयीची अधिक माहिती नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
हेल्पलाईन क्रमांक – ७०२८० ३९०९९, ७०२८० ४९०९९, ७०२८० ७९०९९