राजकारणात निवृत्तीचे वय किती ?
‘गल्लीपासून देहलीपर्यंत राजकारणात ज्येष्ठ नागरिक सतत कार्यरत असतात. त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हायला हवे, तसेच तरुण तडफदार पिढीला पुढे आणण्याचा प्रयत्न करावा. त्यांचा मार्ग मोकळा करावा. जसे सरकारी किंवा सहकारी खात्यातील नोकरीत ५८-६० वर्षे झाली की, निवृत्त व्हावे लागते. मग राजकारणात निवृत्तीचे वय तरी किती ? अमेरिकेसारख्या देशात एकदा मोठी पदे (अध्यक्ष) भोगल्यास वयस्कर व्यक्ती निवृत्त होतात, तसेच तरुण नेत्यांना वाव देतात. असे अनुकरण आपण का करू नये ?
– श्री. सखाराम एकशिंगे (केनवडेकर), गोरंबे, कागल, कोल्हापूर