पूजेच्या वेळी ‘सनातन संस्थेनुसार साधनेचा मार्ग योग्य आहे का ?’, असे देवाला विचारणे, त्या वेळी अकस्मात् चौरंग देवाच्या दिशेने सरकणे
‘१३.७.२०२० या दिवशी संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे पूजा करत होते. तेव्हा मी माझ्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि उजव्या हाताला तिळाच्या तेलाचा दिवा तेवत ठेवला होता. त्यामुळे मला पुष्कळ प्रसन्न वाटत होते आणि मला सकारात्मक ऊर्जेची जाणीव होत होती. काही वेळाने (अकस्मात्) दोन्ही दिव्यांतून सूर्याच्या किरणांप्रमाणे किरण निघत आहेत आणि ‘ते किरण माझ्या दिशेने येत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी माझा भाव जागृत झाला आणि माझे अंतःकरण भरून आले. तेव्हा मला ‘देवाशी बोलावे’, असे वाटले आणि मी देवाला विचारले, ‘देवा, तुझ्या कृपेमुळे मी सनातन संस्थेशी जोडले गेले आहे. मी निवडलेला हा मार्ग योग्य आहे ना ?’ त्या वेळी मी बसलेले आसन (चौरंग) अकस्मात् देवाच्या दिशेने सरकले. या आधी चौरंग हळूहळू सरकत असे; परंतु आज ‘उपस्थित असलेल्या चांगल्या शक्तीने आसन सरकवून मला कौल दिला आहे’, असे वाटले.’
– सौ. प्रियांका सावंत, ठाणे (१४.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |