‘साधना करणे’, हाच सर्व समस्यांवरील एकमात्र उपाय आहे’, याची जाणीव झाल्यावर त्वरित साधनेला आरंभ करणार्या श्रीमती ज्योती राणे !
‘साधना करणे’, हाच सर्व समस्यांवरील एकमात्र उपाय आहे’, याची जाणीव झाल्यावर त्वरित साधनेला आरंभ करणार्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या देहली येथील श्रीमती ज्योती राणे !
१. कु. रश्मि परमेश्वरन, केरळ
१ अ. श्री. विक्रम साराभाई यांनी श्री. राणे यांना ‘भारतीय अंतराळ संशोधन केंद्रा’त नोकरीसाठी बोलावल्यावर राणे कुटुंबीय अमेरिकेतून थिरूवनंतपूरम् येथेे वास्तव्याला येणे : ‘सौ. ज्योती राणे मूळच्या मुंबईच्या आहेत. लग्न झाल्यावर त्या अमेरिकेला गेल्या. त्यांचे यजमान (दिनकर राणे) वैज्ञानिक होते. त्या काळात थिरूवनंतपूरम् येथे ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’चे स्पेस सेंटर (भारतीय अंतराळ संशोधन केंद्र) चालू झाले होते. आता ते ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ या नावाने ओळखले जाते. श्री. विक्रम साराभाई यांनी त्यांच्या यजमानांना खास भेटून त्यांना भारतात बोलावले. तेव्हा काका-काकू आणि त्यांची दोन मुले थिरूवनंतपूरम् येथे वास्तव्यास आले.
१ आ. वैज्ञानिकाची पत्नी आणि उच्चभ्रू लोकांच्या संपर्कात असल्याने अध्यात्मापासून दूर असलेल्या राणेकाकूंना ‘आपण आनंदी नाही’, याची जाणीव असणे : राणेकाकू ‘इनर व्हील क्लब’च्या (एका आंतरराष्ट्रीय महिला संघटनेच्या) सदस्या होत्या. त्यामुळे त्यांचा थिरूवनंतपूरम् येथील प्रसिद्ध आणि धनाढ्य उच्चभ्रू लोकांशी संपर्क असायचा. त्यांच्याजवळ धनसंपत्ती आणि मान-सन्मान हे सर्व असले, तरीही ‘आपण आनंदी नाही’, हे त्यांना जाणवत होते. मुळात एका वैज्ञानिकाची पत्नी असल्याने त्या ‘देवपूजा किंवा अध्यात्म’ यांपासून दूर होत्या.
१ इ. सनातन संस्थेच्या सत्संगात सांगितल्यानुसार साधना आणि सेवा चालू करणे : वर्ष २००१ मध्ये त्या रहात असलेल्या वसाहतीत सनातन संस्थेच्या वतीने महिलांसाठी सत्संग चालू करण्यात आला. सत्संगाच्या आरंभीच त्यांच्या मनातील काही शंकांचे निरसन झाले. नंतर त्या मनापासून नामजप करू लागल्या. त्यांना आलेल्या अनुभूतींमुळे त्यांची श्रद्धा दृढ झाली आणि त्या साधना करू लागल्या. त्या जिज्ञासूंना संपर्क करणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, सात्विक उत्पादने वितरण करणे, अर्पण गोळा करणे, मासिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करणे आदी सेवा करू लागल्या.
१ ई. सर्वांशी समभावाने वागणे आणि शिकण्याच्या स्थितीत राहून स्वीकारण्याची वृत्ती असणे : त्या कोची सेवाकेंद्रात आल्यावर साधनेच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट शिकून घेतात. त्यांना ‘साधनेच्या दृष्टीने योग्य विचार काय आहे’, हे सांगितल्यावर त्या तो मनापासून स्वीकारतात. त्यांच्यात अल्प अहं असल्याने त्या परेच्छेने वागू शकतात. त्यांच्यात प्रतिक्रिया येण्याचे प्रमाण अत्यल्प असून त्या सगळ्यांशी समभावाने वागतात.
काकू जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्या. त्याविषयी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘हा दिवस लवकरच येणार’, असे मला गेले वर्षभरापासून वाटत होते.’
२. सौ. सुमा पुथलथ, केरळ
२ अ. घरचे दायित्व संभाळून प्रसाराला येणे आणि पतीच्या दिनक्रमाशी जुळवून घेऊन उत्साहाने साधना करणे : मी प्रसारासाठी त्रिवेंद्रमला गेल्यावर ज्योतीकाकूंच्या घरी रहायचे. तेव्हा त्यांना माझ्या समवेत प्रसारासाठी प्रत्येक ठिकाणी यायची उत्सुकता असायची. त्यांचे यजमान आहार, औषधोपचार, झोप इत्यादी सर्व गोष्टी वेळेत करायचे. काकू त्यांच्या दिनक्रमामध्ये बाधा न आणता प्रसारासाठी यायच्या. त्यांचे यजमान घरात मोठ्या आवाजात दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम लावून ठेवायचे. त्या वेळी काकू काहीही गार्हाणे न करता दुसर्या खोलीत बसून नामजप करायच्या. नंतर काका स्वतःहून हळू आवाजात कार्यक्रम लावू लागले.
२ आ. कोची सेवाकेंद्रात आल्यावर साधनेविषयी जाणून घेणे आणि सेवा करणे : त्या कोची येथे आल्यावर माझ्या खोलीत रहात. पूर्वी त्या घरातील नातेवाइकांविषयी गार्हाणे करत. नंतर त्यांना जाणीव झाली, ‘साधना करणे’, हाच या समस्येवर एकमात्र उपाय आहे.’ गुरुकृपेने सर्व समस्यांवर त्या जलद गतीने मात करू शकल्या. सेवाकेंद्रात आल्यावर त्या साधनेविषयी अधिक जाणून घ्यायच्या. त्या नेहमी मला सेवा द्यायला सांगायच्या. त्या शिवणकाम करण्यात निपुण असल्याने सेवेत साहाय्य करायच्या.
३. श्री. देवेन पाटील, देहली सेवाकेंद्र
३ अ. प्रथम भेटीतच राणेकाकूंविषयी आपुलकी वाटणे : माझी राणेकाकूंशी प्रथम भेट देहली सेवाकेंद्रातील एका सत्संगात झाली. त्यांना पाहूनच मला त्यांच्याविषयी आपुलकी जाणवली. त्यांना पाय दुखण्याचा त्रास आहे, तरीही त्या त्याविषयी गार्हाणे करत नाहीत. त्या परिस्थिती स्वीकारून ‘कसे प्रयत्न करू ?’, असे नेहमी विचारतात.
३ आ. सेवेशी एकरूप होणे : त्या प्रत्येक सेवा एकाग्रतेने करतात. त्या सेवा करतांना कुणाशी अनावश्यक बोलत नाही. त्या सेवेशी समरस होतात.’
४. कु. प्रणिता सुखटणकर, केरळ
४ अ. श्रीमती ज्योतीकाकू देहली ते केरळ असा प्रवास एकटीने करतात.
४ आ. प्रेमभाव : साधक त्यांच्या घरी गेल्यावर त्या साधकांना आवडेल, असा खाऊ बनवायच्या. त्यांच्या घरात कामाला येणार्या मावशींशी त्या आदराने आणि प्रेमाने व्यवहार करतात. त्या मावशी गेल्या ४० वर्षार्ंपासून काकूंच्या घरी काम करत आहेत.
४ इ. सेवेची तळमळ : मी आणि सौ. सुमाताई त्यांच्याकडे प्रसाराला गेलो होतो. त्या वेळी ‘आपण पुष्कळ सेवा करायला हवी’, अशी काकूंची तळमळ होती. त्या त्यांच्या परिचयातील व्यक्तींना भ्रमणभाष करून संपर्क सेवेचे नियोजन करायच्या. आमच्या समवेत सेवेसाठी कधीही येण्याची त्यांची सिद्धता होती.
४ ई. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव : त्यांना जीवनात पुष्कळ कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. त्यांच्यात परात्पर गुरु डॉक्टरांच्याप्रती भाव आणि श्रद्धा आहे. काही प्रसंगाविषयी बोलतांना त्यांचे डोळे पाणवतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |