अकोला येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आचार्याच्या कानशिलात लगावली !
अफरातफर केल्याचा संशय
अकोला – राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी ५ एप्रिल या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांसाठी देण्यात येणार्या जेवणासाठीच्या धान्यात मोठी अफरातफर झाल्याचे लक्षात आल्यावर एका आचार्याच्या कानशिलात लगावली. बच्चू कडू यांनी जिल्हा रुग्णालयातील खानावळीला भेट दिली. या वेळी कडू यांना खानावळीतील डाळीच्या दैनंदिन वापरात अपहार होत असल्याचे लक्षात आले आणि त्यातूनच त्यांनी स्वयंपाक्याच्या कानाखाली लगावली; मात्र ‘लोकप्रतिनिधीने असे मारणे कितपत योग्य आहे’, असा प्रश्न या घटनेतून निर्माण होत आहे.