कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध काटेकोरपणे पाळा ! – जयंत पाटील, पालकमंत्री
सांगली – कोरोनाची दुसरी लाट मोठी असून गंभीर आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध काटेकोरपणे पाळण्यासाठी सांगली जिल्हावासियांनी साथ द्यावी, असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘बाधित रुग्णांसाठी खाटा, औषधे आणि प्राणवायू यांचा साठा उपलब्ध ठेवावा. जिल्हा वार्षिक योजनेचा ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार असून यातून कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यांसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात.’’