दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाणाला श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल घातल्यावर अनुभवायला आलेले पालट !
१. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाणाला श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल घातले नसतांना आघातांची वृत्ते वाचल्यावर चीड निर्माण होणे
‘पूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील आघातांची वृत्ते वाचल्यावर त्या वृत्तांचा परिणाम मनावर पुष्कळ काळ टिकून रहायचा. आघातांची वृत्ते वाचल्यावर मनात चीड निर्माण व्हायची आणि अनावश्यक विचार येऊन त्या विचारांमध्येच राहिले जायचे. त्या घटनेविषयी माझ्या मनात प्रतिक्रिया यायच्या. ‘आपल्या जवळच्यांविषयी असे झाले, तर’ असे अनावश्यक विचारही मनात यायचे आणि त्या विचारांमध्ये काही घंटे, तर कधी एक दिवसही वाया जात असे.
२. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाणाला श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल घातल्यावर रज-तमात्मक वृत्तांचा परिणाम अधिक काळ न रहाणे
‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाणाला श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल घातल्यामुळे रज-तमात्मक वृत्ते वाचल्यावरही त्याचा परिणाम अधिक काळ रहात नाही’, असे मला अनुभवायला आले. आताही वृत्त वाचल्यावर माझ्या मनात चीड निर्माण होते; पण त्याचा परिणाम फार वेळ न रहाता त्यातून बाहेर पडून वर्तमान स्थितीत रहाण्याचा भाग होतो. ‘गुरुदेवांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मानसिक किंवा बौद्धिक स्तरावर पालट न करता आध्यात्मिक स्तरावर पालट केल्याने हे अनुभवता आले’, याविषयी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.
३. अखंड साधकांचाच विचार करणारे आणि कर्तेपणा स्वतःकडे न घेणारे संत !
मी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील अनुभव एका संतांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘एवढ्या २० वर्षांमध्ये हा उपाय का सुचला नाही ?’, याचा मी विचार करत आहे. इतकी वर्षे साधक आणि वाचक यांना अशी रज-तमात्मक वृत्ते वाचावी लागली.’’
हे ऐकून ‘संतांच्या मनात साधकांविषयी किती वात्सल्यभाव आहे !’, याची जाणीव मला झाली आणि ‘तशी खंत मला कधी माझ्या चुकीविषयी वाटत नाही’, हे लक्षात आले. ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे हे सर्व अनुभवण्याची संधी मिळाली’, यासाठी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.’
– श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंंदु जनजागृती समिती (१६.१०.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |