मागण्या मान्य न झाल्यास लवकरच धान्य वितरण बंद करणार !
|
रत्नागिरी – महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना रास्त भाव रेशनिंग दुकानदार स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अविरतपणे सेवा देत आहेत. आम्ही वेळोवेळी मागण्या करूनही आम्हाला पुढील समस्यांविषयी कोणत्याही समस्येचे निरसन राज्य किंवा केंद्रामार्फत झाले नाही, तरी याचा आपण योग्य तो विचार करावा अन्यथा रास्त भाव रेशनिंग दुकानदार धान्य वितरण करणे बंद करतील, अशी चेतावणी रेशनिंग दुकानदारांच्या संघटनेने दिली आहे.
संघटनेच्या समस्या
१. कोरोना महामारीच्या काळात ‘ई पोस मशीन’ला ‘यू.एस्.बी. कॉर्ड एक्सटेन्शन’ मिळणेविषयी
२. अद्ययात रेशनिंग कार्ड सीडिंग योजना. राज्य सरकारच्या अधिकार्यांमार्फत करून घेण्याविषयी
३. धान्याचा पुरवठा आणि रेशनिंग दुकानदारांचे कमिशन याविषयी
४. ई पोस मशीनला अद्ययावत नेटवर्क मिळणेविषयी
५. राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील रास्त भाव रेशनिंग दुकानदारांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देणेविषयी या आणि अन्य समस्यांचे निरसन करण्याची मागणी संघटनेने केली आहे.