देवाची आवड असणारी आणि भजने आनंदाने ऐकणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली जळगाव येथील चि. मोक्षदा अमोल शिंदे !

देवाची आवड असणारी आणि भजने आनंदाने ऐकणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली जळगाव येथील चि. मोक्षदा अमोल शिंदे  (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. मोक्षदा अमोल शिंदे एक आहे !

फाल्गुन कृष्ण पक्ष एकादशी (७.४.२०२१) या दिवशी जळगाव येथील चि. मोक्षदा अमोल शिंदे हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. मोक्षदा अमोल शिंदे
चि. मोक्षदा अमोल शिंदे

चि. मोक्षदा अमोल शिंदे हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. गर्भधारणेनंतर

१ अ. तिसरा मास – ‘मी कानळदा येथील कण्वऋषींच्या आश्रमात गेल्यावर मला पुष्कळ आनंद आणि चैतन्य जाणवत होते. तेव्हा मला ‘आश्रमातून जाऊच नये’, असे वाटत होते.

१ आ. चौथा मास – तुळजापूर येथील श्री भवानीदेवी आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल यांच्या दर्शनाला गेल्यावर मला पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवल्याने मला अतिशय कृतज्ञता वाटली.

१ इ. सातवा मास – एकदा आमच्या घरात एक फुलपाखरू तीन ते चार दिवस शांतपणे बसले होते. (बाळाच्या जन्मानंतर मी माहेरी गेल्यावरही चार दिवस फुलपाखरू घरात येत होते.)

२. बाळाच्या जन्माच्या दिवशी

अ. मी रात्री १२ वाजता रुग्णालयात भरती झाल्यावर तिथे आधुनिक वैद्य किंवा प्रसुती विभागातील परिचारिका नसल्याने शस्त्रकर्म विभागातील परिचारिकांनी माझी प्रसुती केली. तेव्हा माझ्याकडून देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

आ. माझा नामजप आणि गुरूंचे स्मरण सतत चालू असतांना ‘हा जीव गुरुदेवांचे स्मरण करतच या जगात पाऊल ठेवत आहे’, असे मला वाटले.

इ. बाळाच्या जन्मानंतर घरातील सर्वांचे व्यष्टी (वैयक्तिक) साधनेचे प्रयत्न वाढले. तेव्हा ‘सर्वांची साधना करून घेण्यासाठी हिचा जन्म झाला आहे’, असे मनात येऊन मला देवाप्रती कृतज्ञता वाटली.

३. जन्मानंतर

३ अ. वय १ मास

१. बाळाचा जन्म झाल्यापासून प्रतिदिन त्याचा तोंडवळा आणि केस यांवर दैवी कण दिसत होते.

२. मी बाळाला घेऊन घरी आल्यावर आमच्या खोलीत एक चिमणी प्रतिदिन घिरट्या घालायची. तिच्याकडे पाहून बाळ आनंदाने हात-पाय हालवायचे.

३. पूर्वी ती सकाळी ९.३० वाजता नामजपाच्या वेळी झोपली, तरी १० वाजता नामजप पूर्ण झाल्यावर उठायची. तेव्हा ‘ती ध्यानाची, नमस्काराची किंवा जयघोषाची मुद्रा केल्याचे मला दिसत असे.

३ आ. वय २ मास – माझी आई तिला जवळ घेऊन ‘ॐ’ चा नामजप करायची. नंतर मोक्षदाही स्वतःहून ‘ॐ’चा उच्चार स्पष्टपणे करू लागल्यावर मला सर्वत्र चैतन्य जाणवले. तेव्हा सर्वांना पुष्कळ आश्‍चर्य वाटले.

३ इ. वय ३ मास – पापड भाजतांना पापडावर ‘ॐ’ उमटल्याचे दिसले.

३ ई. वय ५ ते ११ मास

३ ई १. सात्त्विकतेची आवड

अ. एकदा आम्ही मोक्षदासमोर वस्त्र, शस्त्र आणि ग्रंथ या वस्तू ठेवल्या होत्या. ती ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ हातात घेऊन खेळू लागली. इतर वेळीही ती या ग्रंथासमवेत घंटोन्घंटे खेळत असते.

आ. गुरुपौर्णिमेला ‘ऑनलाईन सत्संग’ चालू होण्यापूर्वी ती २ घंटे (तास) झोपली आणि उठल्यानंतर तिने काही त्रास न देता आणि काही न खाता-पिता ४ घंटे शांत बसून सत्संग ऐकला.

३ ई २. देवाची आवड

अ. तिला श्रीकृष्णाच्या चित्रासमोर नेल्यावर ती त्या चित्रावरून हात फिरवून आनंद व्यक्त करते. ते पाहून माझी भावजागृती होते आणि मलाही आनंद मिळतो.

आ. दत्तगुरूंच्या चित्राजवळ नेले की, तिला आनंद होतो आणि ती चित्र जवळ घेण्याचा प्रयत्न करते.

३ ई ३. आरती आणि भजने ऐकतांना आनंद होणे 

अ. एकदा आम्ही देवघरात आरती म्हणतांना मोक्षदा माझ्या मांडीवर बसली होती. आरतीचे शब्द ऐकताच ती टाळ्या वाजवू लागली. त्या वेळी तिच्या तोंडवळ्यावर अतिशय आनंद जाणवत होता.

आ. प.पू. भक्तराज महाराजांचे ‘या गुरुराया मम मंदिरा’ हे भजन लावल्यावर ‘ती आर्ततेने देवाला आळवत आहे’, असे मला वाटते.

इ. दत्तगुरूंचे भजन लावल्यावर तिला पुष्कळ आनंद होतो. ती हसत टाळ्या वाजवते आणि आनंद व्यक्त करते.

ई. ती कधीही रडत असेल किंवा मध्यरात्री अचानक उठली, तरी भजने किंवा नामजप लावताच ती शांत होते.

४. स्वभावदोष

हट्टीपणा

– सौ. अवनी अमोल शिंदे (चि. मोक्षदाची आई), पाचोरा, जिल्हा जळगाव. (२.२.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक