कोरोना केंद्रासाठी शिवाजी विद्यापिठाची इमारत कह्यात घेणार ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर
कोल्हापूर, ५ एप्रिल – कोल्हापुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा प्रशासनाने शासकीय इमारती कोरोना उपचारांसाठी कह्यात घेतल्या होत्या. आता दुसरी लाट आल्याने पुन्हा शासकीय इमारती कह्यात घेण्यासाठी हालचाली चालू आहेत; मात्र काही संस्थांनी त्यांच्या इमारती देण्यास नकार दिला आहे. ज्या संस्थांनी इमारती दिल्या होत्या, त्यात ५०० ते ७०० खाटांची सोय करण्यात आली होती. या इमारती आता मिळणार नसल्याने कोरोना केंद्रासाठी शिवाजी विद्यापिठाची इमारत कह्यात घेणार असून ‘जम्बो कोविड सेंटर’ चालू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांना दिली.