इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निर्णयाच्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक !
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात २ दिवसांची दळणवळण बंदी लागू करण्यात आली, तसेच इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रहित करण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निर्णयाच्या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ६ एप्रिल या दिवशी महत्त्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल. या बैठकीला शिक्षण मंडळाचे अधिकारी उपस्थित असण्याची शक्यता आहे.
दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या संदर्भातही लवकरच निर्णय घेण्यात येईल.