गोहत्येतील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक
६ पोलीस घायाळ
उत्तरप्रदेशात कायद्याचे राज्य आहे कि धर्मांधांचे ? पोलिसांवर दगडफेक करण्याचे धर्मांधांचे धाडस होतेच कसे ? ‘अशा वेळी स्वरक्षणार्थ गोळीबार करण्याचा आदेश पोलिसांना का देण्यात येऊ नयेत ?’ असा प्रश्न उपस्थित होत असेल, तर तो चुकीचा कसा ठरेल ?
इटावा (उत्तरप्रदेश) – येथील विल्लोचियान मोहल्ल्यामध्ये गोहत्येतील आरोपी अनीस उपाख्य साजन याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अनीस आणि त्याचे साथीदार यांनी दगडफेक केली. यात ६ पोलीस घायाळ झाले. यात एक महिला पोलीस कर्मचार्याचा समावेश आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी अनीस याच्या ५ सहकार्यांना अटक केली आहे.