१८ ते ३५ वयोगटातील तरुणांना तातडीने लसीकरण करण्याची व्यवस्था करावी !
राष्ट्रवादी काँग्रेसचे जीतेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांकडे ट्वीटद्वारे मागणी
मुंबई – जगभरात भारत हा तरुणांचा देश आहे, अशी आपली ओळख आहे. कोरोनाच्या संक्रमण काळात कोरोनाची लागण तरुणांना अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना तातडीने लसीकरण करण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे जीतेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ट्वीटद्वारे केली आहे.
‘जीव धोक्यात घालून फिरणार्या पत्रकारांनाही लस द्यावी’, अशी विनंती आव्हाड यांनी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करणार असल्याचे सांगितले.