लातूर येथे ऑक्सिजन सिलेंडरच्या मागणीत वाढ !
लातूर – जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची मागणी वाढत आहे; मात्र १ सहस्र सिलेंडरची मागणी असतांना ७०० सिलेंडरचा पुरवठा होत आहे. जिल्ह्यात ५ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यामुळे १२ नंबर पाटी, समाजकल्याण विभागाची इमारत, तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालय हे कोविड सेंटर म्हणून पुन्हा चालू करण्यात आले आहेत. येथील दोन्ही एजन्सीना ऑक्सिजन लिक्विड हे मुंबई येथून पुरवले जात आहे; मात्र रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लिक्विडचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे मत एजन्सीधारकांनी व्यक्त केले आहे.