भोपाळ येथे दुकान बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण !
|
|
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील काझी कॅम्प परिसरात ३ एप्रिलच्या रात्री ११ वाजता मदीना टी स्टॉल हे चहाचे दुकान बंद करण्यास गेलेल्या पोलिसांवर दुकानाचा मालक जहीर याचा मुलगा सावेज, सुलेमान आणि त्याचे सहकारी यांनी पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच त्यांच्यावर उकळता चहा ओतला. (पोलिसांवर उकळता चहा ओतण्याचे दुःसाहस धर्मांध करतात, यातून त्यांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे दिसून येते ! – संपादक)
लॉकडाउन के दौरान दुकान बंद कराने गए पुलिसकर्मियों पर हमला, दुकानदारों ने फेंकी खौलती चाय, बरसाए पत्थर#Lockdown #Coronavirus #COVID19 https://t.co/R63aE9dabb
— Zee MP-Chhattisgarh (@ZeeMPCG) April 4, 2021
तसेच याच दुकानाच्या वर असलेल्या घरातून पोलिसांवर दगडफेक केली. (धर्मांध नेहमीच दगड किंवा तत्सम शस्त्रे यांचा साठा करतात आणि त्यांना हवे तेव्हा समाजविघातक कृत्य करतात ! – संपादक) यात घरातील महिलांचाही समावेश होता. या दगडफेकीत काही पोलीस घायाळ झाले. (धर्मांधांच्या हातून मार खाणारे पोलीस हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात ! – संपादक) कोरोनामुळे भोपाळमध्ये रात्री ९ पासून संचारबंदी लागू केल्याने पोलिसांनी दुकान बंद करण्यास सांगितले होते.