जगात हिंदु आणि ख्रिस्ती ३५ टक्क्यांनी, तर मुसलमान ७३ टक्क्यांनी वाढत आहेत ! – प्यू रिसर्च सेंटर
वर्ष २०५० मध्ये जगात हिंदू १३८ कोटी होतील, तर मुसलमान २७६ कोटी !
अशा वाढीमुळे भविष्यात जगावर इस्लामचे राज्य आल्यास आश्चर्य वाटू नये !
नवी देहली – जगात एकीकडे मोठे धर्म (ख्रिस्ती, हिंदु आदी) ११ ते ३५ टक्क्यांच्या गतीने वाढत आहेत, दुसरीकडे मुसलमानांची लोकसंख्या ७३ टक्क्यांनी म्हणजे सर्वाधिक गतीने वाढत आहे, असा अहवाल अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने दिला आहे.
या अहवालानुसार पुढील ३० वर्षांत जगाची लोकसंख्या ९३० कोटी होईल, जी वर्ष २०१० च्या लोकसंख्येच्या ३५ टक्क्यांनी अधिक असेल.
१. ज्यू आणि बहाई यांच्या लोकसंख्या वाढीचा दर अधिक आहे. त्या तुलनेत हिंदु आणि ख्रिस्ती यांच्या लोकसंख्या वाढीचा दर सामान्य आहे. याउलट मुसलमानांच्या लोकसंख्येची वाढ दुप्पट गतीने होत आहे. बौद्धांच्या लोकसंख्येत ०.३ टक्क्यांनी घट होत आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
२. वर्ष २०१० मध्ये २१६ कोटी असलेले ख्रिस्ती वर्ष २०५० मध्ये २९० कोटी होतील. हिंदू १०३ कोटी होते, ते १३८ कोटी होतील, तर मुसलमान १५९ कोटी होते, ते २७६ कोटी होतील, अशी आकडेवारीही यात देण्यात आली आहे.
३. ‘प्यू’ च्या अहवालानुसार जगाचा जन्मदर सरासरी २.१ असणे आवश्यक आहे. सध्या हा २.५ इतका आहे. हिंदूंचा जन्मदर २.४ इतका आहे. मुसलमानांचा ३.१ इतका आहे म्हणजे आवश्यकतेपेक्षा हा १५० टक्क्यांनी अधिक आहे.