चहा बनवून न दिल्याने रईसुद्दीनकडून पत्नी शबनम हिला तलाक
तलाकच्या विरोधात कायदा करण्यात आल्यानंतरही अशा घटना चालू आहेत. याचा अर्थ धर्मांधांना शिक्षेची भीती वाटत नाही, असेच म्हणावे लागेल ! त्यामुळे आता अधिक कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारने यात पालट केला पाहिजे !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील लोनी भागात रहणार्या शबनम यांना त्यांच्या रईसुद्दीन या पतीने चहा बनवून न दिल्याने तलाक दिला आणि तिला घरातून बाहेर काढले. या प्रकरणी शबनम यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. तिला ४ मुले आहेत. रईसुद्दीन रिक्क्षा चालवण्याचे काम करतो.