संभाजीनगर येथे २ वर्षांत ४ सहस्र ९७ जणांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला !
सुस्त महापालिका प्रशासन !
संभाजीनगर – शहरात गेल्या २ वर्षांत ४ सहस्र ९७ जणांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने काही दिवसांपासून नागरिकांना कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात दिवसाला १०-१५ जणांना कुत्रा चावल्याच्या घटना घडत आहेत. कुत्रा चावलेल्या व्यक्तीला ‘रेबीज’ची लस दिली जाते. सध्या महानगरपालिकेकडे ‘रेबीज’ लसीचे ९ सहस्र डोस उपलब्ध आहेत. ही ‘रेबीज’ लस महानगरपालिकेची ४ आरोग्य केंद्रे आणि घाटी रुग्णालय येथे उपलब्ध आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोड यांनी दिली. (मोकाट कुत्र्यांनी ४ सहस्र ९७ लोकांचा चावा घेतला, यावरून महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा कोणताही बंदोबस्त न केल्याचे दिसून येते. याला उत्तरदायी असणार्या संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करणे जनतेला अपेक्षित आहे. – संपादक)