केरळमध्ये ख्रिस्ती संघटनांकडून ‘लव्ह जिहाद’ला विरोध
सामाजिक माध्यमातून लव्ह जिहादचा व्हिडिओ प्रसारित
एर्नाकुलम् (केरळ)- विवाह करून पत्नीला घरी आणले आणि काही वेळातच तिला जिहादी आतंकवाद्यांना विकून टाकले, अशा आशयाचा एक व्हिडिओ केरळमधील ख्रिस्त्यांमध्ये सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. ही तरुणी मुसलमान तरुणाच्या प्रेमात अडकून त्याच्या समवेत पालकांचा विरोध झुगारून पळून गेली होती, असे यात म्हटले आहे. विवाहानंतर नवर्याने तिच्या कपाळावरील कुंकू काढले, तोंडावळा ओढणीने झाकला. थोड्या वेळाने धर्मांधांची टोळी आली. त्यांच्याशी या पतीने बोलणे केले आणि पत्नीला विकून टाकले, असा यात दाखवण्यात आले आहे. ‘ख्रिश्चन असोसिएशन अँड अलायन्स फॉर सोशल अॅक्शन’ या संघटनेने फेसबूकवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
१. या संघटनेने म्हटले आहे की, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वातील डावी आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी यांनी आजपर्यंत केलेल्या मुसलमानांच्या लांगूलचालनाचीच ही फळे आहेत. लव्ह जिहादच्या नावाखाली आतंकवादाला त्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे राज्यात लव्ह जिहादचा आतंकवाद वाढत आहे. त्यांना पोसणारी मुळेच छाटून टाकण्याची आवश्यकता आहे.
२. गेल्याच वर्षी केरळमधील सर्वांत मोठ्या असलेल्या सायरो मलबार चर्चने याविषयी एक पत्रक जारी केले होते. त्यात ख्रिस्ती महिलांना ‘लव्ह जिहाद’चे लक्ष्य केले जात असल्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती.