कुंभमेळ्यामध्ये बैरागी आखाड्यांच्या धर्मध्वजाची स्थापना
हरिद्वार, ४ एप्रिल (वार्ता.) – निर्वाणी, निर्मोही अनी, दिगंबर या तीनही बैरागी आखाड्यांच्या धर्मध्वजाची स्थापना झाल्याचे आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरि महाराज यांनी घोषित केले. त्यानंतर आता कुंभमेळ्याशी संबंधित धार्मिक अनुष्ठान (विधी) चालू होणार आहेत. या प्रसंगी सर्व १३ आखाड्यांच्या प्रतिनिधींसह कुंभमेळा अधिकारी दीपक रावत उपस्थित होते. गोवर्धनपुरी पिठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अधोक्षजानंद देवतीर्थ यांनी गंगापूजन केले. या वेळी तीनही आखाड्यांचे श्री महंत आणि संत उपस्थित होते. संन्याशी आखाड्यांच्या धर्मध्वजाची स्थापना मार्च मासात झाली आहे.