सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ
मुंबई – मुकेश अंबानी यांच्या निवास स्थानाच्या बाहेर स्फोटकांसाठी वापरल्या जाणार्या जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची पोलीस कोठडी ७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने ३ एप्रिल या दिवशी हा निर्णय दिला.