भ्रमणभाषवर ओटीपी क्रमांक विचारून युवकाची दीड लाख रुपयांची फसवणूक

सावंतवाडी – बँकेतून बोलत असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीने एका युवकाला भ्रमणभाषवर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) क्रमांक विचारला अन् त्याच्या खात्यातील तब्बल १ लाख ६३ सहस्र रुपये काढून फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या युवकाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या वेळी पोलिसांनी सायबर कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.