महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे?
आपत्काळाच्या वेळी युद्ध चालू असल्यास काही राष्ट्रद्रोह्यांकडून किंवा पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटना यांच्याकडून परिस्थितीचा अपलाभ घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याच वेळी शत्रू राष्ट्राच्या बाजूने काही राष्ट्रद्रोही उठाव करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी त्यांच्याकडून नियोजनबद्धरित्या हिंसाचार, लुटमार आणि राष्ट्रविरोधी कारवाया केल्या जाऊ शकतात. त्यांचा बंदोबस्त करण्यास पोलीस, अर्धसैनिक दल यांना कष्ट घ्यावे लागतील. यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होऊन रक्तपात होऊ शकतो. अशा वेळी स्वतःचे रक्षण करण्यासह देशाचे रक्षण करण्याचे दायित्व समाजावर असणार आहे. विशेषतः हिंदूंना यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. याविषयी कोणती सतर्कता बाळगायला हवी, पूर्वनियोजन म्हणून काय करायला हवे, आदी गोष्टीची माहिती या लेखात देण्यात आली आहे. बंडाळीच्या घटना सर्वत्रच होतील, असेही नाही; मात्र कुठेही झाली, तरी त्या काळात स्वरक्षण आणि समाजरक्षण यांसाठी कोणती कृती करावी, यासाठी हा लेख प्रसिद्ध करत आहोत. हा लेख प्रसिद्ध करण्याचा उद्देश हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा नसून प्रतिकूल परिस्थितीत उद्भवणार्या हिंसाचाराला आळा घालून स्वरक्षण करण्याचा आहे. येथे व्यक्तीपेक्षा समाज आणि राष्ट्र यांचे रक्षण यांना अधिक महत्व आहे.
भाग १०.
भाग ९. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/463913.html
९. राष्ट्रद्रोह्यांची बंडाळी !
९ अ. बंडाळीपूर्वी हे करा !
९ अ १. बंडाळीच्या आपत्तीपासून बचाव करण्यासाठी पूर्वनियोजन करावे ! : राष्ट्रद्रोह्यांकडून अशा प्रकारचा हिंसाचार झाला, तर राष्ट्रप्रेमींसाठी ती एक अकस्मात् आलेली आपत्तीच असेल. यातून वाचण्यासाठी पूर्वनियोजन असणेच अत्यावश्यक आहे.
९ अ २. तरुणांचे संघटन आणि दिशादर्शन, यांसाठी ठिकठिकाणी प्रबोधन चळवळ राबवावी ! : बंडाळीसारख्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी राष्ट्रप्रेमींचा संपर्कयंत्रणा सिद्ध करतांना स्वतःच्या रक्षणासाठी समाजमन सिद्ध करणे आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या गावागावांतील तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार स्वरक्षणासाठी सहभागी करून घेणे, ही दोन्ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवावी लागतील. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यायामशाळा, तरुण मंडळे, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळे यांच्या कार्यकर्त्यांना अशा आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या ठिकाणी एकत्र यायचे, आल्यावर कोणती कृती करायची, यांविषयीचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. आपल्या संघटनेचे विविध उपक्रम राबवतांनाही हे उद्दिष्ट आपल्या डोळ्यांसमोर हवे.
९ अ २ अ. बंडाळीपूर्व काळात प्रबोधनात्मक कार्यशाळांचे आयोजन करा ! : राष्ट्रप्रेमी संघटनांनी बंडाळीपूर्व काळात वसाहती, कार्यालये आदी ठिकाणी कार्यशाळा घ्यायला हव्यात. सामान्यांसाठीच्या या कार्यशाळेत पुढील गोष्टी सांगाव्यात…
९ अ २ अ १. ‘बंडाळी म्हणजे काय ?’, हे राष्ट्रप्रेमींना सांगणे : ‘बंडाळी म्हणजे काय ? ती कशी होऊ शकते ? बंडाळी होण्यापूर्वी काय करावे ? आदी गोष्टींची माहिती द्यावी.
९ अ २ अ २. बंडाळीला तोंड देण्याविषयी मानसिकता सिद्ध करणे आणि प्रत्यक्ष हिंसाचाराच्या वेळी राष्ट्रप्रेमी कुटुंबे अन् मालमत्ता यांचे रक्षण कसे करावे, हे सांगावेे : राष्ट्रप्रेमींसमोर बंडाळींच्या कारणांचे कल्पनाचित्र उभे करून ‘समोरची व्यक्ती काय विचार करत आहे आणि काय स्थिती निर्माण होणार आहे’, हे शिकवायला हवे. मुलांना हे शिकवायला हवे, तसेच वसाहती आणि कार्यालय येथे याविषयी कार्यशाळा घ्यायला हव्यात.
९ अ २ अ ३. बंडाळींना सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या सिद्धता करणे आवश्यक ! : बंडाळींना सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या सिद्धता करणे, हा मोठा भाग आहे. बंडाळीसारख्या प्रसंगात, उदा. बाजारात जातांना अचानक हिंसाचारसदृश परिस्थिती उद्भवली, तर त्या वेळी स्वत:चे आणि इतरांचे रक्षण कसे करायचे, हे अभ्यासवर्ग घेऊन सांगितले पाहिजे.
९ अ २ अ ४. घर आणि कार्यालय येथे स्वरक्षणाची सिद्धता करा ! : राष्ट्रप्रेमी घरात आणि घराबाहेर, अशा दोन्ही ठिकाणी शस्त्रहीन आणि बेसावध असतात. बंडाळी करणारे शस्त्रसज्ज असण्याची शक्यता आहे. अशा वेळी स्वरक्षणासाठी कायद्याने दिलेल्या अधिकारानुसार प्रयत्न करायला हवेत.
९ अ ३. स्वरक्षणासाठी घरातील वस्तूंचा वापर करा : देशद्रोह्यांच्या बंडाळीच्या काळात स्वरक्षण करण्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करता येऊ शकतो, उदा. कपडे वाळत घालण्याची काठी, न्हाणीघरातील पाईप आदी.
९ अ ४. शांतता काळात राष्ट्रप्रेमींचे आपत्काळासाठी विविध गट सिद्ध करा : बंडाळी होण्यापूर्वी त्याच्यापासून रक्षण होण्यासाठी पूर्वसिद्धता करणे, हाच उत्तम पर्याय आहे. या पूर्वसिद्धतेमध्ये समाजातील सर्व घटक सहभागी झाले, तरच हे संकट आपण परतवू शकतो. त्यासाठी वाहनधारक, वाहनचालक, बचाव गट, प्रथमोपचार आणि वैद्यकीय उपचार गट, पीडित राष्ट्रप्रेमींची अन्न, वस्त्र अन् निवारा यांची आवश्यकता भागवण्यासाठी दानशूर व्यक्ती, अधिवक्ते, राष्ट्रनिष्ठ विचारवंत अशा विविध व्यक्तींचे गट सिद्ध करणे. या गटांच्या नेत्यांची निवड, त्यांची संपर्कयंत्रणा यांसारख्या गोष्टींवर शांतता काळात विचारविनिमय करून धोरण निश्चित करणे आवश्यक आहे.
या गटांपैकी बचाव गटाची कामगिरी अधिक जोखमीची असल्याने यातील कार्यकर्ते शारीरिकदृष्ट्या सक्षम, प्रतिकारसज्ज आणि मानसिकदृष्ट्या कणखर असतील, याची काळजी घ्यायला हवी. हेच गट अन्य आपत्तींच्या प्रसंगीही उपयुक्त ठरतील.
९ अ ५. महिलांची पूर्वसिद्धता करून घ्या ! : बंडाळी चालू झाल्यास राष्ट्रप्रेमी महिलांनी काय करायचे, याची पूर्वसिद्धता करून आणि त्याविषयीचे प्रशिक्षण शांतता काळातच घेऊन ठेवले पाहिजे. महिलांवर आक्रमण होण्याच्या शक्यतेने त्यांच्याकडे साहाय्य मागण्यासाठी शिटी असणे, तसेच रक्षणासाठी पेपर स्प्रे किंवा मिरची पावडर समवेत असणे आवश्यक आहे.
९ अ ६. सार्वजनिक स्थळांच्या रक्षणाचे नियोजन करा !
९ अ ६ अ. मंदिरसुरक्षा : बंडाळीच्या वेळी राष्ट्रद्रोह्यांकडून मंदिरांवर दगडफेक करणे, मंदिरांत गोमांस / विष्ठा टाकणे, मंदिरांची नासधूस करणे, असे अनेक प्रकार होऊ शकतात. त्यामुळे मंदिरांच्या सुरक्षेसाठी पुढील कृती प्रयत्नपूर्वक करायला हव्यात.
९ अ ६ अ १. मंदिरांभोवती सशक्त तटबंदी उभी करा ! : मंदिरांच्या सुशोभिकरणाला दुय्यम प्राधान्य देऊन त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरांभोवती सशक्त तटबंदी उभारण्याला प्राधान्य द्यायला हवे. ही तटबंदी बांधण्याचे महत्व मंदिर विश्वस्तांना पटवून द्यायला हवे, तसेच आर्थिक उत्पन्न अल्प असलेल्या मंदिरांभोवती तटबंदी बांधण्यासाठी लोकांचे प्रबोधन करून लोकवर्गणीतून किंवा उत्पन्न चांगले असलेल्या मंदिरांच्या साहाय्याने हे कार्य पूर्ण करायला हवे.
९ अ ६ अ २. मंदिरांच्या रक्षणार्थ तरुणांची गस्तीपथके सिद्ध करा ! : बंडाळीच्या कालावधीत युवकांचे गट करून त्यांना आळीपाळीने दिवस-रात्र मंदिरांच्या सुरक्षेसाठी गस्त घालण्याचे दायित्व देणे आवश्यक आहे. मंदिरांत होणार्या वाढत्या चोर्या, मूर्तीभंजन या घटनांचे वाढते प्रमाण पाहिले, तर मंदिरांच्या सुरक्षेसाठी हिंदूंनी आता प्रतिदिन मंदिरांना पहारा देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
९ अ ६ अ ३. समाजाला आठवड्यातून एकदा मंदिरात एकत्रित येण्याची सवय लावा ! : आठवड्यातून कमीत कमी एकदा नामजप, सामूहिक आरती, कीर्तन, भजन यांसारख्या धार्मिक उद्देशाने जवळच्या मंदिरात एकत्र येण्याची सवय हिंदू समाजाला लावा. याचा लाभ राष्ट्रद्रोह्यांच्या बंडाळीच्या काळात एकत्र होण्यासाठी होईल.
९ अ ७. राष्ट्रनिष्ठ अधिवक्ते आणि डॉक्टर यांचे प्रभावी संघटन करा ! : आपत्काळात कदाचित् खासगी रुग्णालये बंद असण्याची शक्यता असू शकते. अशा वेळी उपचारांचा सर्व भार शासकीय रुग्णालयांवर येऊ शकतो. शासकीय रुग्णालयांत तातडीने उपचार होत नसल्यामुळे त्याचा फटका रुग्णांना बसतो. हे टाळण्यासाठी शांतता काळात डॉक्टरांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक स्वतःजवळ ठेवणे अन् त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक असते. रुग्णांना वैद्यकीय दाखले देण्यासाठीही या डॉक्टरांचे साहाय्य होऊ शकते.
९ आ. बंडाळीच्या वेळी हिंसाचार चालू असतांना हे करा !
९ आ १. प्रत्यक्ष हिंसाचाराच्या ठिकाणी एकटे-दुकटे असाल, तर हे करा !
९ आ १ अ. हिंसाचाराच्या वेळी रस्त्यावरून पळतांना आजूबाजूला दुचाकी असेल आणि तिच्यावर शिरस्त्राण (हेल्मेट) असेल, तर ते घालावे. त्यामुळे डोके सुरक्षित रहाते.
९ आ १ आ. आग, दगडफेक, गोळीबार, लाठीमार आदी होत असल्यास त्या परिस्थितीत त्या ठिकाणाहून लवकर बाहेर कसे पडता येईल, ते पहावे.
९ आ १ इ. रस्त्याच्या मध्यातून लोकांचा जमाव पळत असेल, तर त्याच्या विरुद्ध दिशेने न पळता त्यांच्यासमवेत पळावे अन् हळूहळू एका बाजूने तेथून निसटून जाण्याचा प्रयत्न करावा; कारण जमावाच्या विरुद्ध दिशेने पळण्याच्या प्रयत्नात आपण पडण्याची भीती असते.
९ आ १ ई. प्रवासात २ भ्रमणभाष संच ठेवा ! : प्रवास करतांना आपल्याजवळ २ भ्रमणभाष संच ठेवल्यास लाभ होईल. आपण प्रवास करत असतांना हिंसाचार चालू झाला, तर एक संच आपल्या खिशात ठेवावा आणि दुसरा कंपन स्थितीत आपल्या पिशवीत ठेवावा. हिंसाचाराच्या वेळी आपल्याकडील सामान वा वस्तू सक्तीने काढून घेण्यास कुणी आलेच, तर खिशातील भ्रमणभाष संच त्यांना द्यावा. यामुळे आपला जीव वाचेल आणि नंतर संपर्कासाठी आपल्याजवळील दुसर्या संचाचा वापर करावा.
९ आ १ उ. कायम सुटे पैसै समवेत ठेवा ! : हिंसाचारग्रस्त प्रभागात पटकन तणाव निर्माण होऊन परिस्थिती बिघडते, हे आपल्याला ठाऊक आहे. त्या क्षेत्रांमध्ये आपण जाणार असू, तर सुटे पैसे खिशात ठेवावेत. मोठ्या रकमेच्या नोटा खिशात ठेवू नयेत. हिंसाचार काळात लूटमार मोठ्या प्रमाणात होत असते. अशा वेळी आपल्याला कुणी लुटायला आलेच, तर त्याला त्वरित लहान रकमेच्या नोटा देऊन आपण सुरक्षित राहू शकतो.
९ आ १ ऊ. आपले वाहन अचानक हिंसाचाराच्या ठिकाणी आल्यास तेथून निघून जाणे : चारचाकी वाहनातून जात असतांना अचानक आपले वाहन हिंसाचार चालू असणार्या मार्गावर आले, तर शांत राहून हळूहळू वाहन पुढे घेऊन तो मार्ग सोडून द्यावा.
९ इ. हिंसाचाराच्या काळात प्रत्येक व्यक्तीची सामाजिक पत्रकारिता महत्वाची ! : आपण घरात असतांना बाहेर हिंसाचार होत असेल, तर सामाजिक पत्रकारितेचा उपयोग करावा. आपण कुठे आहोत, हिंसाचाराच्या ठिकाणी काय चालले आहे, हे थोड्या थोड्या वेळाने इतरत्रच्या सर्व लोकांना सांगत रहावे. अफवा पसरवू नयेत. आपल्या भागातील अधिकाधिक पत्रकारांचे संपर्क क्रमांक आपल्या भ्रमणभाष संचात नोंद करून ठेवावे.
९ ई. हिंसाचार काळात राष्ट्रप्रेमींची प्रभावी संपर्कयंत्रणा असणे अत्यावश्यक ! : देशात कुठेही बंडाळीमुळे हिंसाचार झाला, तर त्याविषयी देशभरातील राष्ट्रप्रेमींना सतर्क करणे आवश्यक आहे, उदा. चेन्नईत हिंसाचार झाला, तर जम्मू आणि देहली या ठिकाणीसुद्धा त्वरित माहिती द्यावी. यासाठी आतापासूनच आपण सर्वांनी प्रभावी संपर्कयंत्रणा निर्माण करणे अत्यावश्यक आहे. लघुसंदेश आणि ई-मेल यांद्वारे सर्वांशी संपर्क साधता येईल, अशीही एक यंत्रणा बनवली पाहिजे.
९ उ. बसस्थानक आणि रेल्वेस्थानक अशा ठिकाणी अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचे नियोजन करणे : हिंसाचाराच्या आरंभीच्या काळात दळणवळणाच्या साधनसुविधांचा अभाव, असुरक्षितता आदी कारणांमुळे बसस्थानक किंवा रेल्वेस्थानक अशा ठिकाणी लोक मोठ्या संख्येने अडकून पडतात. अशांना त्यांच्या सुरक्षित मुक्कामी पोचवण्याचे दायित्व आपण सांभाळायला हवे. जमावबंदी वा अन्य कारणांमुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी पोचवणे शक्य नसल्यास त्यांच्या अन्नपाण्याच्या तात्पुरत्या व्यवस्थेच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
९ ऊ. संख्येने अल्प असलेल्या भागातील राष्ट्रप्रेमींच्या साहाय्याचे नियोजन करा ! : हिंसाचार चालू झाल्यानंतर ज्या भागात राष्ट्रप्रेमींची संख्या अल्प आहे, असे वाटते, त्या भागातील राष्ट्रप्रेमींच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यायला हवे. अशा वेळी इतरत्रच्या राष्ट्रप्रेमींनी त्या राष्ट्रप्रेमींचे रक्षण करण्यासाठी पोलीस अधिकार्यांवर दबाव आणायला हवा.
९ ए. महिला आणि राष्ट्रनिष्ठ यांचे साहाय्य घेऊन पोलिसांकडे आपली बाजू मांडा ! : हिंसाचाराच्या कालावधीत त्यात न अडकलेल्या (उदा. वयोवृद्ध, महिला आदी) राष्ट्रनिष्ठांची भूमिका परिणामकारक ठरू शकते. यांपैकी काही लोकांनी महिलांना समवेत घेऊन पोलीस ठाण्यात संबंधित अधिकार्यांकडे जावे. त्यांनी शांतपणे राष्ट्रप्रेमींवरील अत्याचारांविषयी (होत असल्यास) पोलिसांना विचारणे चालू करावे. यामुळे शांतता निर्माण करण्यासाठी राष्ट्रप्रेमींचा प्रयत्न चालू आहे, असे वातावरण निर्माण होण्यास साहाय्य होईल.
९ ऐ. अन्यत्रच्या राष्ट्रप्रेमींनी करायचे प्रयत्न : एखाद्या भागात हिंसाचार चालू झाला की, तेथील लोकांना पोलीस खात्यातील उच्चस्तरीय अधिकारी भेटत नाहीत. त्यामुळे ज्या भागात हिंसाचारसदृश्य स्थिती नाही, अशा भागांतील प्रतिष्ठित राष्ट्रप्रेमींनी पोलीस खात्यातील वरिष्ठांना भेटून त्यांना राष्ट्रप्रेमींवरील अत्याचार आणि तात्कालिक परिस्थिती यांविषयी सांगावे.
९ ओ. पोलिसांना साहाय्य करण्यासाठी प्रयत्न : हिंसाचाराच्या कालावधीत शांतता निर्माण करण्यासाठी शासन केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल अशा सशस्त्र पोलीसदलांना पाचारण करते. राष्ट्रप्रेमींनी स्वयंसेवक बनून या पोलिसांना शक्य ते साहाय्य (उदा. पाणी देणे, बसण्यासाठी खुर्ची देणे आदी) करावे.
९ औ. माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा ! : हिंसाचाराच्या कालावधीत राष्ट्रप्रेमींवर होणारा अन्याय दर्शवणारी विविध छायाचित्रे आणि चित्रीकरण, हे ‘ट्विटर’, ‘फेसबूक’, ‘यू ट्यूब’, अशा सामाजिक संकेतस्थळांवर ठेवून ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावीत. तसेच काही वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे नियतकालिकांनाही पाठवावीत.
हिंसाचाराच्या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती सांगण्याचा प्रसंग आल्यास खटकणार्या गोष्टी त्यांनी ठामपणे मांडाव्यात. तात्काळ ट्वीट करून त्यात स्थानिक पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना टॅग करावेत.
९ अं. हिंसाचारानंतर हे करा !
९ अं १. दंगलग्रस्त विस्थापित राष्ट्रप्रेमींचे संरक्षण आणि पुनर्वसन : बंडाळीच्या वेळी राष्ट्रद्रोह्यांच्या हिंसाचारामुळे राष्ट्र्रप्रेमींची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी पोचलेली असते, अशांची स्थिती नाजूक असू शकते. अशांना प्रशासनाने साहाय्य न केल्यास अन्य राष्ट्रप्रेमींनी आधार दिला पाहिजे. यासाठी ऑनलाईन अर्पण गोळा करता येऊ शकते.
९ अं २. विस्थापित राष्ट्रप्रेमींच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करणे : राष्ट्रप्रेमींच्या घरांची नासधूस, जाळपोळ झाल्यास ते मोठ्या प्रमाणात विस्थापित होतात. अशांंच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था शांतता काळातच करून ठेवणे आवश्यक आहे. मोठी सभागृहे आणि देवस्थाने यांच्या जागेचा वापर या कारणांसाठी करता येईल. विस्थापित राष्ट्रप्रेमींना अंथरूण, कपडे यांचीही आवश्यकता असते. हिंसाचाराची झळ न पोचलेल्या भागात साहाय्य फेरी काढून अंथरूणे, कपडे गोळा करून त्यातून विस्थापित राष्ट्रप्रेमींची तात्पुरती सोय करता येईल.
९ अं ३. विस्थापितांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था : विस्थापित झालेल्या राष्ट्रप्रेमींची उदरनिर्वाहाची तात्पुरती व्यवस्था करण्याच्या दृष्टीकोनातून आपले प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, व्यापारी, उद्योजक यांचेही साहाय्य घेता येईल. त्यासाठी लागणारा निधी आणि अन्नधान्य यांचे दायित्व त्यांच्यावर सोपवता येईल.
९ अं ४. विस्थापितांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे नियोजन करणे : डॉक्टरांचे प्रबोधन करून विस्थापितांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा पुरवणे शक्य आहे. त्यांच्याकडे असणार्या ‘सॅम्पल’च्या औषधांमधून विनामूल्य औषधेही त्यांना पुरवता येतील.
९ अं ५. हिंसाचारग्रस्तांसाठी असलेल्या सुविधांचा लाभ मिळवून देणे : हिंसाचार आटोक्यात आल्यानंतर विस्थापित हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रप्रेमींनी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी त्यांना हानीभरपाई मिळवून देणे, हिंसाचारग्रस्तांसाठी असलेल्या सुविधांचा लाभ मिळवून देणे, यादृष्टीने साहाय्य करायला हवे.
(समाप्त)