गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे भारतासहित संपूर्ण जगामध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिर्विद पंडित दिवाकर त्रिपाठी, संचालक, ‘उत्थान’ ज्योतिष संस्थान
येणारा काळ हा संकटकाळ असणार आहे, हे अनेक संत-महंतांनी सांगितले आहे. हे लक्षात घेऊन या संकटकाळात तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !
नवी देहली – येत्या ५ एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. सध्या मकर राशीत असणारा हा ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. पुढील १३ मास गुरु ग्रह या राशीत रहाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रहाचे राशी परिवर्तन ही महत्त्वाची घटना मानली जाते. या परिवर्तनाचा प्रभाव व्यक्ती, समाज आणि देश यांच्यावर होत असतो. गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे भारतासहित संपूर्ण जगामध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते, असे भविष्य ‘उत्थान’ ज्योतिष संस्थानचे संचालक आणि ज्योतिर्विद पंडित दिवाकर त्रिपाठी यांनी वर्तवले आहे. ‘यामुळे सर्वांनाच सतर्क आणि सावध रहाण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रभावी लसींची निर्मिती होऊन कोरोनाचा प्रभाव न्यून होतांना दिसेल’, असेही त्यांनी म्हटले आहे.
ज्योतिर्विद पंडित दिवाकर त्रिपाठी यांनी सांगितलेले गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे भारतावर होणारे काही परिणाम !
१. देशात अंतर्गत भागातील काही ठिकाणी अशांती निर्माण होऊ शकते, तर भारताच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होऊ शकते.
२. भारतात अंतर्गत उठाव, आंदोलने, जातीय आणि धार्मिक दंगली अल्प होतील.
३. जागतिक स्तरावर भारताच्या पराक्रम, यश आणि सम्मान यांत वाढ होईल. मित्रराष्ट्रांचे सहकार्य मिळू शकते.
४. भूकंप, भूर, आग, भूस्खलन, चक्रीवादळ आदी नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात.