विरोधक वा तज्ञ यांचा दु:स्वास करून नाही, तर प्रत्यक्ष कृतीचे विवेचन कोरोना थांबवायला साहाय्यक ठरेल ! – देवेंद्र फडणवीस
मुंबई – मागील वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरच आहोत. रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजावून सांगण्याची, त्यांच्या साहाय्याला धावून जाण्याची आमची सिद्धता आहे. अमेरिका, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिले आहे. तुलना केवळ परिस्थितीशी नको, तर सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे.
विरोधक वा तज्ञ यांचा दु:स्वास करून नाही, तर प्रत्यक्ष कृतीचे विवेचन कोरोना थांबवायला साहाय्यक ठरेल, असे ‘ट्वीट’ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी जनतेशी थेट साधलेल्या संवादावर केले आहे.
होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…
आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची…#CoronaInMaharashtra @CMOMaharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2021