हडपसर येथील एस्पी इन्फोसिटी आस्थापनात १७६ कोरोनाचे रुग्ण !
कर्मचार्यांच्या आरोग्याशी खेळणार्या आस्थापनाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !
हडपसर – येथील एसपी इन्फोसिटी आस्थापनामध्ये टप्प्याटप्प्याने १७६ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या आस्थापनाने कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेतली नाही. महापालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या आदेशाचेही उल्लंघन केले. त्यामुळे या आस्थापनाचे व्यवस्थापक संजीव यादव आणि ठेकेदार संजय लावंड यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
या प्रकरणी हडपसर साहाय्यक आयुक्त कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक नवनाथ शेलार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.