दोंडाईचा (जिल्हा धुळे) येथे धर्मांधांनी पोलीस ठाण्यात दंगल करून हिंदु मुलीची छेड काढणार्‍या आरोपींना पळवले !

  • रुग्णालयातही दंगल; एकाचा मृत्यू  

  • अंदाधुंद दगडफेक 

  • ४ पोलीस घायाळ

  • येणार्‍या काळात धर्मांध कसे वागणार आहेत, याचीच ही नांदी आहे. पोलिसांचा यत्किंचितही धाक नसणारे धर्मांध कायदा हातात घेऊन पोलिसांवर आक्रमण करून पोलीस ठाण्यात आणि रुग्णालयात दंगल करतात, या घटनेवरून धर्मांधांची मोगलाई दिसून येते !
  • धर्मांध आरोपींना शिक्षाच करायची नाही, अशी सर्व धर्मांधांची इच्छा असते, हे लक्षात घ्या ! दंगल हे हत्यार सतत उपसणार्‍या धर्मांधांना तोंड देण्यासाठी हिंदूंनी स्वरक्षण प्रशिक्षण घ्यावे !
  • धर्मांधांकडून सातत्याने मार खाणे पोलिसांना लज्जास्पद ! धर्मांधांपासून स्वतःचे आणि पोलीस ठाण्याचेही रक्षण करू न शकणारे पोलीस हिंदूंचे रक्षण काय करणार ? यासाठी हिंदूंनीच आता संघटित व्हायला हवे !

दोंडाईचा (जिल्हा धुळे) – धर्मांधांच्या जमावाने येथील पोलीस ठाण्यावर आक्रमण करून हिंदु अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना पळवून नेले. हा जमाव नियंत्रित करतांना पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यानंतर धर्मांधांच्या जमावाने रुग्णालयात धुडगूस घातल्यामुळे झालेल्या जोरदार मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. या दंगलीच्या प्रकरणी ३ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

१. हिंदु अल्पवयीन युवती ३१ मार्च या दिवशी बस थांब्यावर उभी असतांना लुल्या उपाख्य शरीफ शेख, कैसर, इमाम शेख आणि एका अन्य तरुण यांनी तिची छेड काढली. ही गोष्ट तिने तिच्या नातेवाइकांना सांगितल्यावर त्यांनी रात्री ८ च्या सुमारास या युवकांना चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. त्यानंतर रात्री १० वाजता धर्मांधांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यावर आक्रमण करत दंगल चालू केली. या वेळी धर्मांधांनी संशयित आरोपींना सोडण्याची मागणी केली.

२. या वेळी धर्मांधांनी पोलीस निरीक्षकांशी वाद घातला, तसेच पोलीस ठाण्यावर अंदाधुंद दगडफेक केली. (धर्मांधांकडे दगड नेहमी सिद्ध कसे असतात ? यावरून ‘ते दंगल करण्याच्याच उद्देशाने पोलीस ठाण्यात जातात’, असे कुणाला वाटल्यात चुकीचे काय ? – संपादक) या वेळी धर्मांधांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना धक्काबुक्की करत मोठी दहशत निर्माण केली. यात दोन पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी घायाळ झाले.

३. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी गोळीबार केला. त्यानंतर धर्मांधांनी पोलीस ठाण्यातून पलायन केले. समवेत जमावाने आरोपींनाही पळवून नेले. (अटकेतील आरोपींनाही सांभाळू न शकणार्‍या पोलिसांना सरकारने तात्काळ सेवामुक्त केले पाहिजे ! – संपादक) 

४. या वेळी एका धर्मांधाच्या हाताला गोळी लागल्याने त्याला दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर धर्मांधांचा जमाव रात्री ११ वाजता परत रुग्णालयात आला आणि त्यांनी धिंगाणा घालत दंगल चालू केली. (यावरून धर्मांधांना सरकार, पोलीस, प्रशासन कुणाचाही जरासुद्धा धाक नाही, हेच स्पष्ट होते ! – संपादक) या वेळी हिंदूंनी समजूत काढूनही धर्मांध ऐकण्यास सिद्ध नव्हते. या वेळी हिंदू आणि धर्मांध यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यात शाहबाजखान गुलाब शाह याचा मृत्यू झाला. त्यामुळे काही हिंदु तरुणांवर गुन्हे नोंद करण्यात आले.

५. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत, यासाठी अन्य शहारांत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेतली. प्रसारमाध्यमांवर अयोग्य माहिती पसरवल्यास कारवाई केली जाईल, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे.