पुणे-सोलापूर महामार्गावरील पथकराच्या दरांमध्ये वाढ
काही मार्गांची दुरुस्ती आवश्यक असूनही पथकर दरवाढ
सोलापूर – सोलापूर-पुणे महामार्गावरील पथकर दरात १ एप्रिलपासून वाढ करण्यात आली आहे. सोलापूर-पुणे रस्त्यावरील पाटस पथकर नाका येथे दुचाकी आणि हलकी वाहने यांना एकेरी प्रवासासाठी ७५ रुपये, तर दुहेरी प्रवासासाठी ११५ रुपये पथकर द्यावा लागणार आहे, तसेच सरडेवाडी पथकर नाक्यावर दुचाकी आणि हलकी वाहने यांना एकेरी प्रवासासाठी ८० रुपये, तर दुहेरी प्रवासासाठी १२० रुपये पथकर भरावा लागणार आहे. बस किंवा ट्रक या वाहनांसाठी पथकराचे दर एकेरी प्रवासासाठी २५५ आणि दुहेरी प्रवासासाठी ३८० रुपये असणार आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे यंदा पथकरामध्ये दरवाढ झाली आहे; मात्र ‘फास्टॅग’ पद्धती चालू होऊनही पथकर नाक्यांवरील रांगा न्यून झालेल्या नाहीत. अनेक पथकर नाक्यांवर पायाभूत सुविधांचा अभाव आहे, तर काही मार्गांची दुरुस्ती आवश्यक असूनही पथकर दरवाढ करण्यात आली आहे.