वैयक्तिक वाहिनीवरून सत्संग शृंखलेचे प्रसारण करणारे अमरावती येथील मानव बुद्धदेव यांचा सत्कार !
सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ सत्संग शृंखलेच्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या ‘कृतज्ञता सप्ताहा’चे निमित्त !
अमरावती – सनातन संस्थेच्या वतीने मागील वर्षापासून समाजासाठी ‘ऑनलाईन’ सत्संगाची शृंखला अखंडित प्रसारित केली जात आहे. सत्संगाच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून ३ ते १० एप्रिल या कालावधीत ‘कृतज्ञता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. समाजातील धर्मप्रेमींनी या सत्संगाचा आनंदप्राप्तीसाठी लाभ करून घेतला, तसेच काहींनी धर्मप्रसार होण्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक वाहिन्यांवरून सहभाग दर्शवला. सनातन संस्थेच्या वतीने त्यांच्या या कार्याची नोंद घेत सत्कार करण्याचे ठरवले. त्याचाच एक भाग म्हणून अमरावती येथील योग वेदांत सेवा समितीचे आणि पूज्यपाद संतश्री आसारामजी बापूंचे शिष्य श्री. मानव बुद्धदेव यांनी त्यांच्या यूट्यूब वाहिनीवरील अधिवेशन, तसेच धर्मसभा यांचा उत्स्फूर्तपणे प्रसार केला. त्यांच्या धर्मकार्यात होणार्या सक्रीय सहभागासाठी सनातन संस्थेच्या वतीने श्रीमती विभा चौधरी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
श्री. मानव बुद्धदेव यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले, ‘‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आपत्काळात ‘ऑनलाईन’ सत्संगांचे आयोजन करून धर्मजागृतीचे मोठे कार्य केले आहे, यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. हे धर्मकार्य अखंड चालू राहो !’’