रेल्वेद्वारे कर्नाटकात जाण्यासाठी कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ असणे बंधनकारक !
सोलापूर – रेल्वेद्वारे महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात प्रवास करणार्या प्रवाशांना कोरोना चाचणी ‘निगेटिव्ह’ असणे बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या रेेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणार्यांनी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी केल्याचा अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक असून १ एप्रिलपासून या निर्णयाची कार्यवाही चालू करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्यातील रेल्वे स्थानकांवर परराज्यातून येणार्या प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना किमान ४ दिवस आधी चाचणी करावी लागणार आहे. त्यानुसार प्रवाशांनी आपला प्रवास सुनिश्चित करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने केले आहे.