‘कोवॅक्सिन’च्या तिसर्या डोसच्या चाचणीला अनुमती
नवी देहली – औषध नियंत्रणाविषयीच्या तज्ञांच्या समितीने कोरोनावरील भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीचा तिसरा डोस देण्याच्या चाचणीला अनुमती दिली आहे. स्वयंसेवकांवर याची चाचणी पुढील ६ मास घेण्यात येणार आहे. या लसीचे पहिले दोन डोस घेतल्यानंतर ६ मासांनी तिचा हा तिसरा डोस घ्यावा लागणार आहे. या डोसमुळे शरिरातील कोरोनाविरोधी रोगप्रतिकारक शक्ती अनेक वर्षांसाठी वाढणार आहे. तसेच कोरोनाच्या नवीन विषाणूंपासूनही ही लस रक्षण करणार आहे.