बंगालमध्ये भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक
बंगालमधील अशा प्रकारचा हिंसाचार कायमस्वरूपी थांबवण्यासाठी बंगाली जनता निवडणुकीद्वारे प्रयत्न करणार का ?
कोलकाता (बंगाल) – बंगाल येथील विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदान १ एप्रिल या दिवशी झाले. यातील नंदीग्राम येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांच्यात लढत आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी शुभेंदु अधिकारी यांच्या वाहन ताफ्यावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. यात गाड्यांच्या काचा फुटल्या. याविषयी अधिकारी म्हणाले की, पाकिस्तानी लोकच असे करू शकतात. ‘जय बांगला’ हे घोषवाक्य बांगलादेशमधून आलेले असून एका समूहाच्या जोरावर विजय मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे, असा आरोप त्यांनी केला. दोनच दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे उमेदवार अशोक डिंडा यांच्या गाडीवरही दगडफेक झाली होती. यात डिंडा यांना दुखापत झाली होती.