आता रेल्वेमध्ये रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत चार्जिंग बंद !

नवी देहली – रेल्वेमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करतांना भ्रमणभाष संच, लॅपटॉप आदी भारित (चार्जिंग) करता येणार नाहीत. रात्री ११ ते पहाटे ५ या काळात रेल्वेतील चार्जिंग पॉईंट बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे.


लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये अनेक प्रवासी यंत्र चार्जिंगसाठी लावून ठेवतात आणि ते पूर्ण झाल्यावर काढण्याचे विसरतात, असे निदर्शनास आले आहे. रात्री चार्जिंगला ही यंत्रे लावल्यावर ती अधिक प्रमाणात चार्ज होऊन गरम होतात आणि त्यातून आग लागण्याची शक्यता निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच काही रेल्वेगाड्यांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला आहे.