वणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या संसर्गात वाढ !
वणी (यवतमाळ), १ एप्रिल (वार्ता.) – वर्षभरात नगण्य; पण आता ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग पुष्कळ वाढलेला आहे. पिंपळगाव, भालर, बोर्डा, कुरई, गणेशपूर या गावांत अधिक प्रमाणात, तर अन्य गावांमध्ये अत्यल्प अशी कोरोनाची स्थिती आहे. लसीकरणाचा वेग वाढत आहे; पण कोरोनाचाही संसर्ग वाढत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.