वर्धा येथील साधकांना रामनाथी आश्रमात असतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘३०.४.२०१७ या दिवशी वर्धा येथील साधक रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी त्यांना आश्रम पहातांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. रामनाथी आश्रमात आल्यावर
१ अ. मन प्रसन्न, शांत आणि आनंदी झाल्याचे जाणवणे : ‘३०.४.२०१७ या दिवशी आम्ही रामनाथी आश्रमात आलो. तेव्हा मन प्रसन्न, शांत आणि आनंदी झाल्याचे जाणवले. नंतर मी हात, पाय आणि तोंड धुतल्यावर मला शरीर हलके झाल्याचे जाणवले. आश्रमात आल्यावर मला सगळीकडे आनंद, चैतन्य आणि शांतता जाणवत होती.’ – सौ. नलिनी दे. कोहाड
१ आ. ‘आश्रमात आल्यानंतर अनेक जन्मांचे सार्थक झाले’, असा विचार येऊन भाव जागृत होणे : ‘रामनाथी आश्रमात आल्यानंतर मी प्रथम धरणीमातेला वंदन करून कृतज्ञता व्यक्त केली. मी आज गुरुकृपेने तिच्या चरणी आले आहे. मला पूर्ण दिवस आश्रमात, म्हणजेच गुरुदेवांच्या चैतन्यमय सान्निध्यात रहायला मिळाले. गुरुदेवांच्या अस्तित्वाने ही भूमी चैतन्यमय झाली आहे. येथील वातावरण प्रसन्न आणि शांत आहे. ‘आश्रमात आल्यानंतर अनेक जन्मांचे सार्थक झाले’, असा विचार येऊन माझा भाव जागृत झाला. येथील प्रत्येक वस्तू चैतन्यमय जाणवत होती. येथील वृक्ष, पाने, फुले एवढेच काय; पण येथे वहाणारा वाराही मनाला मोहीत करत होता.
१ इ. येथील साधिकांमधील प्रेमभाव आणि आपुलकी पाहून मन भारावून गेले.’ – सौ. अनिता मनोहरराव फुसे
१ ई. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहून ‘ते बोलत आहेत’, असे वाटणे आणि श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून भाव जागृत होणे : ‘स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘ते माझ्याशी बोलत आहेत’, असे मला वाटले. त्यांच्याकडे पाहून माझी भावजागृती झाली आणि मला पुष्कळ आनंद झाला. श्रीकृष्णाच्या प्रतिमेकडे पाहून माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले.’ – सौ. नलिनी दे. कोहाड
१ उ. ‘आश्रमात पाय ठेवताक्षणी थंड वारे मला स्पर्श करत होते. आश्रमात प्रवेश केल्यावर मला शांतता आणि चैतन्य जाणवत होते. येथे आल्यावर मला साक्षात् स्वर्गसुखाची अनुभूती आली.’ – सौ. कांचन माहुर
२. ध्यानमंदिर पहातांना
२ अ. ध्यानमंदिरात गेल्यावर प्रत्येक देवतेच्या चित्रामधून भरभरून चैतन्य मिळत असल्याचे जाणवून हलकेपणा जाणवणे : ‘ध्यानमंदिरात गेल्यावर ‘मी देवाच्या प्रत्येक चित्राला फूल वहात आहे’, असे मला जाणवले. प्रत्येक देवतेच्या चित्रामधून मला भरभरून चैतन्य मिळून हलकेपणा आणि पुष्कळ आनंद जाणवला. मी मार्गावरून चालतांना लक्ष्मीमाता आणि दुर्गामाता हत्तीच्या समवेत समोर आल्याचे जाणवले.’ – सौ. नलिनी दे. कोहाड
२ आ. देवतांचे दर्शन होणे : ‘ध्यानमंदिरात आरतीच्या वेळी शंखनाद होत असतांना प्रत्यक्ष श्रीकृष्ण युद्धभूमीवर रथामध्ये आरूढ होऊन शंखनाद करत आहे’, असे मला जाणवले. ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांची पूजा करत आहे. त्यांना प्रदक्षिणा घालत आहे’, असे मला जाणवले. ‘ध्यानमंदिरात प्रत्यक्ष श्री दुर्गामाता उभी असून मी तिच्या चरणांची पूजा करत आहे. तेथे शेषनाग भव्य रूपात दिसला. प्रत्यक्ष श्रीविष्णु त्या शेषनागावर पहुडला आहे’, असे मला जाणवले. ‘प.पू. भक्तराज महाराज माझ्या हृदयस्थानी आहेत’, असे मला वाटत होते.
३. परात्पर गुरु डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीत बसून नामजप केल्यावर आलेल्या अनुभूती
३ अ. पायर्यांवरून पुढे पुढे जातांना स्वर्ग आणि मोक्ष दिसणे, नंतर गुरुदेव वैकुंठाला घेऊन जातांना दिसणे आणि ते साधिकेला श्रीकृष्णाच्या चरणी घेऊन जातांना दिसणे : परात्पर गुरु डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीत नामजप करतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण दिसले. मी आकाशाला भिडणार्या पायर्या चढत असल्याचे दिसून त्या पायर्यांवरून पुढे पुढे जातांना मला स्वर्ग आणि मोक्ष यांचे द्वार दिसले. नंतर गुरुदेव मला वैकुंठाला घेऊन गेल्याचे आणि नंतर ते मला श्रीकृष्णाच्या चरणी घेऊन गेल्याचे दिसले. – सौ. शिल्पा भोयर
३ आ. नामजपाला बसल्यावर ‘ॐ’ आणि ‘स्वस्तिक’ गोल फिरत असल्याचे दिसणे : दुसर्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीत बसून नामजप करतांना मला ‘ॐ’ आणि ‘स्वस्तिक’ गोल फिरत आहे’, असे जाणवले. नंतर मला त्रिशूळ अन् डमरूही दिसले. त्यानंतर मी ध्यानातून बाहेर आले.’ – सौ. नलिनी दे. कोहाड
४. पू. सौरभ जोशी यांच्याविषयी आलेल्या अनुभूती
४ अ. चैतन्य अनुभवायला मिळणे : ‘पू. सौरभदादा यांच्याकडे पाहिल्यावर ते आनंदी दिसत होते. त्यांच्याकडे पाहून प्रेमभाव जागृत होऊन मला आनंद झाला आणि चैतन्य अनुभवायला मिळाले.’- सौ. नलिनी दे. कोहाड
४ आ. ‘पू. सौरभदादांना भेटल्यावर मला पुष्कळ आनंद जाणवला. ‘ते गुरुदेवांना ‘श्री’ म्हणतात’, हे ऐकून ‘प्रत्यक्ष गुरुदेवच तेथे आहेत’, याची मला जाणीव झाली.’ – सौ. सविता दि. भोंड
४ इ. ‘पू. सौरभदादांना भेटल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. त्यांच्यातील प्रेमभाव पाहून माझी भावजागृती होऊन डोळ्यांत भावाश्रू आले.’ – सौ. कांचन माहुर
५. लागवडीत गेल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. ‘आश्रमातील लागवडीतील वृक्षांकडे पाहिल्यावर ‘तेथील वृक्ष गुरुचरणी शरण आले आहेत’, असे मला जाणवले. तेथे मला थकवा जाणवला नाही. माझे पायही दुखले नाहीत. मला आनंद झाला.’ – सौ. नलिनी दे. कोहाड
आ. ‘लागवडीत गेले असतांना ‘साक्षात् श्रीविष्णु आणि श्री महालक्ष्मी येथे विराजमान आहेत अन् शेषशायी नाग आश्रमाचे संरक्षण करत आहे’, असे मला जाणवले.’ – सौ. सविता दि. भोंड
इ. ‘लागवडीतील प्रत्येक झाड जणू ईश्वराच्या चरणी नतमस्तक झाले असून सर्व झाडे साधना करत आहेत’, असे मला जाणवले.’ – सौ. कांचन माहुर
ई. ‘लागवडीत गेल्यावर ‘वृंदावनात फिरत आहोत’, असे मला वाटले.’ – सौ. अनिता मनोहरराव फुसे
६. आश्रमातील साधकांकडून शिकायला मिळलेली सूत्रे
अ. ‘आश्रमातील साधक शिस्तीचे पालन करतात. ते सांगितल्यानुसार प्रत्येक कृती करतात. सर्व साधक वेळेचे पालन करतात. कुणीही अनावश्यक बोलतांना दिसत नाही. आश्रमातील साधकांमध्ये एकमेकांविषयी पुष्कळ प्रेमभाव आणि आदर आहे.
आ. साधक सतत नामजप आणि प्रार्थना करत सेवा करतात. ते सतत ईश्वराच्या अनुसंधानात रहातात.
इ. साधकांमध्ये आज्ञापालन आणि काटकसर हे गुण पहायला मिळतात.’ – सौ. सविता दि. भोंड आणि सौ. अनिता मनोहरराव फुसे
ई. ‘पू. शंकर गुंजेकर आणि कु. ऐश्वर्या जोशी यांच्याविषयीच्या ध्वनीचित्र-चकत्या पाहून ‘सेवेविषयी तळमळ आणि प्रत्येक ठिकाणी भाव कसा ठेवावा ?’, हे शिकायला मिळाले.’ – सौ. अनिता मनोहरराव फुसे
७. अनुभूती
७ अ. झोप अपुरी होऊनही थकवा न जाणवणे : ‘रामनाथी आश्रमात येतांना आम्हाला प्रवासात जराही थकवा जाणवला नाही. आमचा सतत नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होत होती. आमची झोप अपुरी होऊनही आम्हाला थकवा जाणवत नव्हता.
७ आ. स्वप्नात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आसंदीत बसलेे असून त्यांच्या चरणांशी बसून नामजप करत आहे’, असे दिसणे : २६.४.२०१७ या दिवशी पहाटे ४ वाजता मला स्वप्नात दिसले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी पांढरा पायजमा आणि बंडी घातली आहे. ते आसंदीत बसले आहेत. मी त्यांच्या चरणांशी बसून नामजप करत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाल्यामुळे मी आनंदात आहे. माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले.’ – सौ. नलिनी दे. कोहाड
७ इ. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून ‘प्रत्यक्ष श्रीकृष्णच येथे उभा आहे आणि त्याच्या मुखावर स्मित आहे’, असे जाणवले. – सौ. शिल्पा भोयर
७ ई. कणाकणात परात्पर गुरु डॉक्टरांचेे अस्तित्व जाणवणे : ‘ध्यानमंदिरात बसल्यावर माझे मन स्थिर झाले. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘ते माझ्याकडेच पाहत आहेत’, असे जाणवले, तसेच ‘भगवान श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यानंतर त्याचे डोळे बोलके वाटले आणि त्याच्या हातातील सुदर्शनचक्र फिरत आहे’, असे मला जाणवले. ‘भगवान श्रीकृष्ण पाठीशी आहे’, हा भाव जागृत होत होता. आश्रमात माझे हात सतत जोडले जात होते आणि प्रार्थना होत होती. येथील कणाकणात मला परात्पर गुरु डॉक्टरांचेे अस्तित्व जाणवत होते.’ – सौ. अनिता मनोहरराव फुसे (१३.६.२०१७)
‘सनातनचे साधक एकमेकांशी साधनेविषयीच बोलतात’, असे लक्षात येणे
‘रामनाथी आश्रमात येतांना नाशिक येथे गाडीत काही साधक चढले. सगळ्यांची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर माहुरेतार्ईंनी भजन म्हटले. सगळ्यांना आनंद झाला. तेव्हा सनातनच्या साधकांमध्ये पुष्कळ प्रेमभाव असल्याचे जाणवले. ‘सनातनचे साधक एकमेकांशी साधनेविषयीच बोलतात. व्यवहारात असे दिसत नाही’, हे लक्षात आले.’
– सौ. नलिनी दे. कोहाड (१३.६.२०१७)
|