सोलापूर जिल्ह्यात दळणवळण बंदीविषयी कोणताही विचार नाही ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
सोलापूर, १ एप्रिल – कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणखीन कडक करण्यासाठी जिल्हा प्रशासन नियोजन करत आहे. यासाठी निर्बंध आणखीन वाढवू; मात्र सध्या दळणवळण बंदीचा विचार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एका वृत्तपत्राशी बोलतांना दिली. कोरोनाबाधित रुग्ण शोधण्यासाठी प्रतिदिन ६ ते ७ सहस्र कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत, असे शंभरकर यांनी या वेळी सांगितले.