पँगाँग सरोवराच्या ठिकाणी भारताने कोणताही प्रदेश गमावलेला नाही !- सैन्यदलप्रमुख नरवणे यांची स्पष्टोक्ती
नवी देहली – पँगाँग येथील तणावाच्या स्थितीमध्ये कॉर्प्स कमांडरस्तरीय चर्चेच्या ९ व्या फेरीनंतर टप्प्याटप्प्याने दोन्ही सैन्य मागे हटले. मला स्पष्ट करावेसे वाटते की, आम्ही कोणताही प्रदेश गमावला नाही, असे प्रतिपादन सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. याविषयी दोन्ही देशांकडून अद्याप चर्चा चालू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१. सैन्यदलप्रमुख नरवणे म्हणाले की, प्रश्न सोडवण्यासाठी भारताने संवादाचा मार्ग स्वीकारला आहे. गोग्रा आणि हॉट स्प्रिंग्ज यांसारख्या ठिकाणांविषयी सध्या चर्चा चालू आहे.
२. भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवर सुरक्षा धोका अन् युद्धाची शक्यता याविषयी सैन्यदलप्रमुख नरवणे म्हणाले की, दोन्ही आघाड्यांवर आपल्याला आव्हाने आहेत आणि त्यासाठी आम्ही सदैव सिद्ध आहोत.