वाराणसी येथे होळीच्या दिवशी अंगावर रंग उडाल्याने धर्मांधांकडून हिंदूंवर दगडफेक !
काही हिंदू घायाळ, तर दोघा धर्मांधांना अटक !
सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता यांचा ठेका केवळ हिंदूंनी घ्यायचा आणि अन्य धर्मियांनी हिंदूंवर आक्रमणे करायची, हेच भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना अपेक्षित आहे का ?
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील सैरया भागामध्ये होळीच्या दिवशी मुसलमान व्यक्तीवर रंग उडल्याने झालेल्या वादातून धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. यात काही हिंदू घायाळ झाले. पोलिसांनी अजीम आणि आसिम यांना अटक केली आहे.
Stones pelted on Dalits by Muslims on Holi in Saraiya, Varanasi, eyewitness says women, too, indulged in violence (@Ravibhu09 reports) https://t.co/JmLGoJYOO4
— OpIndia.com (@OpIndia_com) April 1, 2021
येथील पोलीस ठाण्याचे अंमलदार मनोज सिंह यांनी सांगितले की, येथे मुसलमान आणि हिंदू यांची घरे एकमेकांना लागून आहेत. तेथेच एक मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी श्री दुर्गादेवीचे लहान मंदिर आहे. येथे होळी खेळल्यावर सर्वजण अंघोळ करत असतांना त्यांच्या अंगावरील कपडे एकमेकांना फेकून मारत असतांना त्यामधील रंगाचे पाणी एका मुसलमानाच्या अंगावर उडाल्याने वाद झाला. त्यातून मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.