गोव्यात २१ जूनपासून पुढील शैक्षणिक वर्षाला प्रारंभ
पणजी, ३१ मार्च (वार्ता.) – गोव्यात प्रतिवर्षी ६ जूनच्या आसपास शाळांना प्रारंभ होतो; परंतु यंदा २१ जूनपासून शाळांच्या पुढील शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. शिक्षण खात्याने शाळांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे वेळापत्रक अधिसूचित केले आहे. हे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. प्रथम सहामाही २१ जून ते २६ ऑक्टोबर, दुसरी सहामाही १७ नोव्हेंबर ते ३० एप्रिल, गणेशचतुर्थीची सुटी ९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर, दिवाळीची सुटी २७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर, नाताळची सुटी २४ डिसेंबर ते १ जानेवारी २०२२ आणि उन्हाळ्याची सुटी २ मे ते ४ जून २०२२. कोरोना महामारीमुळे चालू शैक्षणिक वर्षाचा कालावधी वाढल्याने पुढील शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकात पालट करावा लागला आहे.