परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या वेळी कर्नाटकातील साधकांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी अनुभवलेले भावक्षण
१. कार्यक्रमाच्या वेळी गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर पोटदुखी उणावणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी माझे पोट पुष्कळ दुखत असल्याने मी दुपारी २.३० वाजेपर्यंत झोपलो होतो. अकस्मात् जाग येऊन मला कार्यक्रमाची आठवण आली आणि मी तेथे पोचलो. तेथे गेल्यावर गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर माझी पोटदुखी उणावली. कार्यक्रम बघतांना मला पुष्कळ आनंद जाणवत होता.’ – अधिवक्ता उमाशंकर
२. ‘जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी माझी छाती आणि डोके पुष्कळ दुखत होते. मी जन्मोत्सवाचा अंक संपूर्ण रात्र हृदयावर ठेवून झोपले. तेव्हा मला रात्री दुखले नाही.’
– सौ. सुनंदा कुटोंजी, धारवाड
३. भावजागृती होणे आणि जड झालेले डोके हलके होऊन समाधान वाटणे
‘गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी भगवान श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होताच माझ्या डोळ्यांत पाणी आले. त्या पाण्यातच मला श्रीविष्णूचे चित्र दिसत होते. मला मिटलेले डोळे उघडून पहाणेही शक्य होत नव्हते. त्या वेळी माझी भावजागृती झाली आणि जड झालेले डोके हलके होऊन समाधान वाटले.’ – सौ. राधिकाराणी
४. ‘डोळे मिटल्यावर मला तुळशीची माळ घातलेले गुरुदेवांचे भावचित्र दिसत होते. गुरुदेवांच्या हृदयकमलात प्रकाश जाणवत होता.’
– सौ. राधा नायक
५. ‘श्रीविष्णु परमात्मा शेषनागावर पहुडला असून तो आशीर्वाद देत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
‘प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी ‘श्रीविष्णु परमात्मा शेषनागावर पहुडला आहे’, असे मला जाणवले. त्याच्या पायाचा अंगठा हलत होता. मी प्रार्थना करतांना तो मला आशीर्वाद देत असल्याचे जाणवून माझी भावजागृती झाली. ‘गुरुदेव आम्हा साधकांसाठी किती करतात !’, असे वाटून भावाश्रू दाटून येत होते.’ – विजयलक्ष्मी देसाई
६. ‘गुरुदेव श्रीविष्णुरूपात दर्शन देतील’, असे वाटत होते. त्या रूपात त्यांचे दर्शन झाल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली.’
– कु. विजयलक्ष्मी
७. ‘गुरुदेवांचे शेषासनावरील रूप पाहून माझे अंग रोमांचित झाले.’
– सौ. कुसुमा गुग्गरी
८. ‘जन्मोत्सवात गुरुदेवांचे विष्णुरूपात दर्शन झाल्यावर वार्यावर डुलत असल्यासारखे वाटले. गुरुदेवांना प्रार्थना करतांना आज्ञाचक्रावर चैतन्य आल्यासारखे वाटले.’
– सौ. सुरेखा पाटील
९. ‘गुरुदेवांच्या दर्शनाने मला धन्य वाटत होते. त्यांचे चरणकमल पहातांना माझा संपूर्ण देह हलका होऊन माझ्या सर्व पेशी चैतन्यमय झाल्या.’
– सौ. पुष्पा बदी
१०. देवतांचे अस्तित्व जाणवणे आणि निर्विचार स्थितीत डोळ्यांतून आनंदाश्रू वहाणे
‘प.पू. गुरुदेवांना पहातांना सर्व देवता इथेच असल्याचे जाणवत होते. देवतांवर पुष्पवृष्टी होत होती. नामजपाला आपोआप प्रारंभ झाला. मी सतत भावावस्थेतच होते. निर्विचार स्थितीत माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वहात होते.’ – सौ. रत्ना सोलापुरी
११. ‘भजो नारायण नारायण…’ हे भजन ऐकतांना भावजागृती होणे आणि अलौकिक असा आनंद जाणवणे
‘भजो नारायण नारायण…’ हे भजन ऐकत असतांना आणि गुरुदेवांची छायाचित्रे पहातांना माझी भावजागृती झाली. हृदयात भक्तीसुमन उमलल्याचे जाणवले. मला अलौकिक असा आनंद होत होता.’
– सौ. सुनीता पत्तार आणि सौ. मंजुळा पवर, धारवाड
१२. गुरुदेवांना आत्मनिवेदन केल्यावर स्वतःला होणार्या त्रासाविषयीचे सर्व विचार नष्ट होत असल्याचे जाणवणे
‘३ – ४ दिवस मला पुष्कळ त्रास होत होता. जन्मोत्सवाच्या दिवशी गुरुदेवांचे दर्शन होत असतांना मनाला समाधान मिळाले. माझ्याकडून आपोआप आत्मनिवेदन झाले. ‘मला होणार्या त्रासाविषयीचे सर्व विचार नष्ट होत आहेत’, असे मला जाणवत होते.’ – कु. नागमणी आचार
१३. ‘डोळे मिटताच ‘सूर्यकिरणांसारखे किरण माझ्या देहात प्रवेश करत आहेत’, असे मला जाणवले.’
– सौ. पवित्रा शेणै
१४. ‘महाविष्णुस्वरूपी गुरुदेवांच्या हास्याने माझ्यात तळमळ आणि भाव निर्माण झाला’, असे मला जाणवले.’
– कु. शिल्पा (मे २०१८)