दौंड (पुणे) येथे कत्तलीसाठी आणलेल्या ४२ गायींची सुटका, ४ धर्मांधांवर गुन्हा नोंद !
गोहत्येमध्ये अग्रेसर असणारे धर्मांध ! गोहत्येच्या वारंवार घडणार्या घटना पहाता गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते !
दौंड – येथील ईदगाह मैदानाजवळ खाटीक गल्लीत २६ गायी आणि लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत ‘कॅनॉल’ जवळच्या शेडमध्ये १६ गायी कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन या गायींची सुटका केली आणि आबिद कुरेशी, आसिफ कुरेशी, वाजिद कुरेशी, तसेच अहमद अब्बास कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. चारही संशयित आरोपी आणि त्यांचे सहकारी पसार आहेत. गायींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली ४ वाहने जप्त केली असून त्या गायींना एका गोशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे.