सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून धिंगाणा घालणार्या २ महामार्ग पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
पोलिसांनी व्यसनी असणे समाजासाठी संकट !
कोल्हापूर, ३० मार्च – शहरात होळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणार्यांच्या विरोधात कारवाई चालू केली आहे. यात कसबा बावडा येथील १०० फुटी रस्त्यावर मद्यपान करून धिंगाणा घालणार्या तिघांवर कारवाई केली आहे. यात बळवंत पाटील आणि राजकुमार साळुंखे या दोन महामार्ग पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे. या सर्वांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (ज्यांच्याकडे कायदा-सुव्यवस्था राखण्याचे दायित्व आहे, तेच जर मद्यपानासारख्या कृत्यात लिप्त असतील, तर त्यांच्याकडून कायद्याची बूज राखण्याची अपेक्षा काय ठेवणार ? यातून धर्मशिक्षणाची अपरिहार्यताही लक्षात येते ! – संपादक)