डोंबिवली येथे नियमाचा भंग करणार्या १२५ आंदोलनकर्त्या व्यापार्यांवर गुन्हे नोंद
ठाणे, ३० मार्च (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते; मात्र व्यापार्यांनी आयुक्तांच्या आदेशाला न मानता आदेश मागे घ्यावेत, अशी मागणी करत २७ मार्च या दिवशी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात काही व्यापार्यांनी मास्क परिधान केले नव्हते, तसेच सामाजिक अंतराचे पालन केले नव्हते. त्यामुळे कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पाटील यांच्या तक्रारीवरून आंदोलनकर्त्या १२५ व्यापार्यांवर डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.